वरळी समुद्रकिनारी तरुणीचा मृतदेह आढळला, मुंबई पुन्हा हादरली !

मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. मीरा रोड, चर्चगेट येथील घटना ताज्या असतानाच आज वरळी सी फेसवर तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली.

वरळी समुद्रकिनारी तरुणीचा मृतदेह आढळला, मुंबई पुन्हा हादरली !
वरळी सी-फेसवर तरुणीचा मृतदेह आढळलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 1:32 PM

मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य आणि चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एका हत्याकांडाने मायानगरी मुंबई हादरली आहे. दक्षिण मुंबईतील वरळी समुद्रकिनारी गोणीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे हात-पाय तोडलेले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचे वय 18 ते 30 दरम्यान असल्याचे कळते. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरु

वरळी सी-फेसवर हातपाय तोडून गोणीत भरलेला मृतदेह टाकण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे. तरुणीची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. तरुणीची ओळख पटल्यानंतरच तिची हत्या कुणी केली?, कोणत्या कारणातून केली? याचा खुलासा होईल.

मुंबईत महिला असुरक्षित

गेल्या काही दिवसांपासून सलग महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. मीरा रोड हत्याकांड, चर्चगेट येथील हॉस्टेलमधील बलात्कार प्रकरण, लोकलमध्ये तरुणीवर बलात्कार, मस्जिद बंदर स्थानकात मुलीचा विनयभंग, चर्नी रोड स्थानकादरम्यान मुलीचा विनयभंग अशा अनेक घटना एकामागोमाग घडल्या. यावरुन गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही हे दिसून येते. यामुळे महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण आहे. अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची मागणी महिलांमधून होत आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.