Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : निर्मनुष्य रस्ता, भरधाव वेग आणि एक धडक, क्षणात खेळ खलास… पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत !

सुमारास झालेल्या या अपघाताबद्दल, नियंत्रण कक्षाद्वारे पोलीसांना सतर्क करण्यात आले. चार ते पाच वाहनांची भीषण टक्कर झाल्याबद्दल पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र, घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचले असता तेथे फक्त एक बुलेट (बाईक) होती.

Mumbai Crime : निर्मनुष्य रस्ता, भरधाव वेग आणि एक धडक, क्षणात खेळ खलास... पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत !
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 9:12 AM

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : भरधाव वेगाने वाहन चालवण्याच्या दुष्परिणामांबद्दल माहिती असूनही अनेक लोक स्पीड लिमिट (control speed limit) नियंत्रणात ठेवत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघातही (accident) घडतात. काहीजण जखमी होतात, पण काहींच्या ते जीवावरही बेतू शकते. अशीच एक अपघाताची दुर्दैवी घटना मुंबईत घडली असून त्यामध्ये पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत (bike accideent in mumbai) झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे एका बाईकची डिव्हायडरशी टक्कर झाली. हा अपघात अतिशय भीषण होता.

अपघातग्रस्त नागरिकांकडे सापडलेले काही पेपर्स आणि डॉक्युमेंट्स यांच्या सहाय्याने त्यांची ओळख पटवण्यात आली. मुलगा मुकेश मौर्य (वय 28) हा अपघात ग्रस्त बुलेट चालवत होता तर त्याचे वडील रामाश्रय मौर्य (वय 55) हे मागे बसले होते.

डिव्हायडरशी झाली धडक

चेंबूर येथील जय अंबे झोपडपट्टीजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघाताबद्दल, नियंत्रण कक्षाद्वारे पोलीसांना सतर्क करण्यात आले. चार ते पाच वाहनांची भीषण टक्कर झाल्याबद्दल पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र, घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचले असता तेथे फक्त एक बुलेट (बाईक) पडलेली होती आणि पिता-पुत्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघेजण जात असलेल्या या बुलेटची डिव्हायडरला जोरदार धडक बसली, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. पहाटेच्या वेलेसे रस्ते सुनसान असल्याने बाईक खूप वेगाने जात होती, त्यामुळे डिव्हायडरला टक्कर दिल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट अतिशय भीषण होता. बाईकची धडक बसल्यावर त्यावर बसलेले दोघेही जण बाईकवरून हवेत उडाले आणि किमान 10-15 फूट दूर अंतरावर फेकले गेले, असेही प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले. तर त्यांची बाईक विरुद्ध दिशेने घसरत गेली.

या अपघाता गंभर जखमी झालेल्या पिता-पुत्राला तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशा प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल होऊनही आरोपी हयात नसल्याने खटला चालवला जात नाही. त्यांच्याकडे मिळालेल्या कागपत्रांच्या सहाय्याने त्यांची ओळख पटवून नातेवाईकांना या दुर्घटने बद्दल माहिती देण्यात आली. पोस्टमॉर्टमनंतर त्यांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले असे पोलिसांनी सांगितले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.