मुंबईच्या डॉक्टरला 25 प्लेट समोसे पडले 1.40 लाखाला, ऑनलाइन कसं फसवलं ते वाचा

हल्ली प्रत्येक जण वेळ वाचावा म्हणून ऑनलाईन ऑर्डरचा पर्याय अवलंबतो. पण हा पर्याय कधी कधी घातक ठरु शकतो हे डॉक्टरसोबत घडलेल्या या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.

मुंबईच्या डॉक्टरला 25 प्लेट समोसे पडले 1.40 लाखाला, ऑनलाइन कसं फसवलं ते वाचा
ऑनलाईन समोसा ऑर्डर करताच डॉक्टरला गीड लाखाला गंडाImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 3:31 PM

मुंबई : हल्ली ऑनलाईनचा जमाना आहे. डिजिटायलझेशनच्या युगात हल्ली प्रत्येक जण खाद्यपदार्थांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूही ऑनलाईन ऑर्डर करतात. यामुळे वेळेचीही बचत होते. पण यामुळे फसणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. अशीच एक मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरसोबत घडली आहे. 25 प्लेट समोशासाठी डॉक्टरला 1.40 लाख रुपये चुकवावे लागले आहेत. शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सायबर चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे एच खळबळ उडाली आहे. समोसे खाणे डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे.

काय आहे प्रकरण?

केईएम रुग्णालयातील 27 वर्षीय डॉक्टरने सहकाऱ्यांसोबत कर्जतला पिकनिकचा प्लान केला होता. यासाठी त्याने गुगलवरुन रेस्टॉरंटचा नंबर काढून 25 प्लेट समोस्यांची ऑर्डर दिली होती. यावेळी रेस्टॉरंटवाल्याने त्याला 1500 रुपये अॅडव्हान्स भरण्यास सांगितले. यानंतर डॉक्टरला व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला. त्यात समोशाची ऑर्डर घेतल्याची पुष्टी करण्यात आली होती. तसेच अॅडव्हान्स रक्कम देण्यासाठी बँक खाते क्रमांकही देण्यात आला होता. यानंतर पैसे भरण्यासाठी एक ट्रान्झेक्शन आयडी बनवावी लागेल असेही डॉक्टरला सांगण्यात आले.

डॉक्टरने आरोपीने सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर आधी 28,807 रुपये, मग अन्य रक्कम असे एकूण 1.40 लाख रुपये डॉक्टरच्या अकाऊंटमधून काढण्यात आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलिसांनी IPC आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.