मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : मुंबईतील महिलांच्या सुरक्षेच्या (mumbai news) प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला जात आहे. मात्र त्यावर कोणतेच ठोस उत्तर मिळत नाही. लोकलमध्ये (mumbai local travel) प्रवास करतानाही महिलांना अनेक त्रास सहन करावे लागतात. काही दिवसांपूर्वी लोकलच्या डब्यात एक व्यसनाधीन तरूण घुसला होता. आता असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लोकलमधील एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण महिलांच्या डब्यात घुसून दरवाजावळ उभा राहून नशा करताना आढळला. दरवाज्याच्या अगदी कडेला, कसलाही सपोर्ट न घेता उभा असलेला तो तरूण नशा करत होता. त्याचे हे कृत्य एका तरूणीने मोबाईलमध्ये कैद केले.
सोशल मीडियावर गदारोळ
हा व्हिडीओ एका एक्स (X) युजरने ( पूर्वीचे ट्विटर) शेअर केल्यानंतर वेगाने व्हायरल झाला. इतर प्रवाशांच्या हितासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हायरल करतानाच तिने हे प्रकरण रेल्वे मंत्रालय आणि शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर एकच गदारोळ माजला. अनेक राजकीय नेते आणि पोलिसांचेही या घटनेकडे लक्ष वेधले गेले.
मुंबई पोलिसांचा रिस्पॉन्स
या घटनेची मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनीही दखल घेतली. या व्हिडिओच्या पोस्टला उत्तर देताना, मध्य रेल्वेच्या अधिकृत हँडलने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले. तर मुंबई पोलिसांनी याचा शोध घेण्यासाठी शहरातील सरकारी रेल्वे पोलिसांना टॅग केले.
सुप्रिया सुळेंनीही उठवला आवाज
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही आवाज उठवला. सार्वजनिक वाहनांचा प्रवासासाठी वापर करताना महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट जसेच्या तसे..
मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतूकीच्या सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. महिलांच्या डब्यात घुसून नशा करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे याबाबत स्पष्ट भाष्य तर करीत आहेच याशिवाय तरुणांना नशेची हि सामुग्री राजरोसपणे मिळत असल्याचे देखील स्पष्ट करीत आहे. रेल्वे सुरक्षा आणि मुंबई पोलीस यांनी समन्वय साधून काम केले तरच अशा प्रकारांना पायबंद घातला जाणे शक्य आहे. या व्हिडिओची रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी नोंद घेऊन उचित ती कारवाई करणे आवश्यक आहे. असे लिहीत त्यांनी रेल्वेमंत्री, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केले
मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतूकीच्या सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. महिलांच्या डब्यात घुसून नशा करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे याबाबत स्पष्ट भाष्य तर करीत आहेच याशिवाय तरुणांना नशेची हि सामुग्री राजरोसपणे मिळत असल्याचे देखील… https://t.co/VlwFK6WcK2
— Supriya Sule (@supriya_sule) October 19, 2023