Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : कुटुंबीय आणि मित्रांसह केक कापला, डिनर करून कामावर निघाला पण… तो परत आलाच नाही ! वाढदिवसाचे ‘ते’ सेलिब्रेशन ठरले अखेरचे..

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करून ऑफीसमध्ये नाईट शिफ्टसाठी निघालेल्या तरूणाचा तो वाढदिवस अखेरचा ठरला. वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसून तो खाली कोसळला आणि...

Mumbai Crime : कुटुंबीय आणि मित्रांसह केक कापला, डिनर करून कामावर निघाला पण... तो परत आलाच नाही ! वाढदिवसाचे 'ते' सेलिब्रेशन ठरले अखेरचे..
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 10:27 AM

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : त्याच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, मित्रमंडळी सगळेच जमले होते. केक कापला, हॉटेलमध्ये जाऊन गप्पा मारत, मजा-मस्ती करत पोटभर जेवलेही. त्यानंतर तो त्याच्या आणखी एका मित्रासह नाइट शिफ्टसाठी ऑफीसला (left for office) जायला निघाला. मात्र अवघ्या थोड्याच वेळात कुटुंबियांना फोन आला, त्यावर जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पाययाखालची जमीनच सरकली. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून कामावर गेलेल्या ‘त्या’ इसमाचा तो शेवटचाच वाढदिवस ठरला. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वच हादरले.

हृदय पिळवटून टाकणारी ही दुर्दैवी आणि तेवढीच दु:खद घटना मुंबईत घडली (mumbai crime news) असून त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे कुटुंबिय शोकाकुल अवस्थेत असून त्यांचा तर या बातमीवर विश्वासच बसत नाहीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश सिंघल (वय 38) असे मृताचे नाव असून तो अँटॉप हिल येथील रहिवासी होता.

काय झालं त्या काळरात्री ?

मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी ही दुर्घटना घडली. त्या दिवशी कमलेश याचा वाढदविस होता. रात्री वडाळा येथील एक रेस्टॉरंटमध्ये त्याने फॅमिली आणि मित्रांसह हसतखेलत जेवण केले. सेलिब्रेशननंतर ऑफीसच्या नाईट शिफ्टसाठी तो निघाला. कमलेश व त्याचा आणखी एक मित्र महेंद्र पानमडे हे दोघेही बाईकवरून ऑफीसच्या दिशेने निघाले. वडाळा- चेंबूर लिंक रोड येथे पोहोचल्यानंतर GJ 21 Y 1550 असा क्रमांक असलेला एक मोठा ट्रेलर ट्रक रस्त्यावर त्यांच्या पुढे होता. तो ट्रक एका लेनमध्ये असल्याने, बाईक चालवणाऱ्या पानमाडे यांनी ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचे ठरवले. मात्र तेवढ्यात ट्र्क त्यांच्याच बाजूला आला आणि बाईकला मोठी धडक बसली.

ड्युटीवरील अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये नेले पण…

त्यावेळी कमलेश सिंघल हा बाईकवर मागील बाजूस बसला होता. ट्रेलर ट्रकची धडक बसताच तो धाडकन खाली कोसळला आणि तो ट्रक थेट त्याच्या अंगावरून गेला. ट्रक ड्रायव्हर तेथे बिलकूल थांबला नाही, ना त्याने स्पीड स्लो केला. तो तिथून थेट फरार झाला. अपघातस्थळी झालेला मोठ्ठा आवाज ऐकून पेट्रोलिंग ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तेथे धाव बचावासाठी घेतली आणि जखमी कमलेशला उपचारांसाठी तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

दुचाकी चालवणारे पानमाजे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.