Mumbai Crime : कांदिवलीत इमारतीला भीषण आग, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर भागातील पवन धाम वीणा संतूर या इमारतीत लागली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

Mumbai Crime : कांदिवलीत इमारतीला भीषण आग, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 4:07 PM

कांदिवली | 23 ऑक्टोबर 2023 : मुंबईत (mumbai news) गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहेच. आता कांदिवलीतही (Kandivli) एका रहिवासी इमारतीला आग (fire in a building) लागल्याचे समोर आले आहे. कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर भागातील पवन धाम वीणा संतूर या इमारतीत लागल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारी १२.३० च्या सुमारास या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरू केले. या आगीमध्ये होरपळल्यामुळे  ५ रहिवासी जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी दोघांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झालेआगीमुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ  केली, अखेर त्यांना यश मिळाले. हे बचावकार्य सुरू असताना इमारतीचा  वीजपुरवठा बंद करण्यात आला.  मात्र  ही आग नेमकी का व कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.