जुना वाद उफाळून आला, शेजारीच शेजाऱ्यावर…, मुंबई हादरली !

शेजाऱ्यांमध्ये काही कारणातून वाद होता. हा वाद उफाळून आला आणि भयंकर घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

जुना वाद उफाळून आला, शेजारीच शेजाऱ्यावर..., मुंबई हादरली !
व्यावसायिक वादातून माजी कर्मचाऱ्याने सीईओ आणि एमडीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 10:55 AM

मुंबई : जुन्या वादातून शेजाऱ्यानेच शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली आहे. मुकेश जनेश शेट्टी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर यश रामदात कोथिंती असे 21 वर्षीय आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुकेशची पत्नी कोमल शेट्टी हिच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. मुकेश शेट्टी बीएमसीत नोकरीला होता. त्याच्या मृत्यूमुळे पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

जुन्या वादातून भररस्त्यात हत्या

मुलुंड येथील सिद्धार्थ नगरमध्ये मुकेश शेट्टी आणि यश कोथिंती हे शेजारी राहत होते. दोघांमध्ये काही कारणातून जुना वाद होता. याच वादातून यशने मुकेशला रस्त्यात गाठले आणि त्याच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात मुकेशच्या पोटावर, छातीवर, पाठीवर आणि डाव्या पायावर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मुकेश रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडला.

पोलिसांनी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

रस्त्यावरुन चाललेल्या वाटसरुंनी मुकेशला रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुकेशला सावरकर रुग्णालयात दाखल नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर मुकेशच्या पत्नीला घटनेची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

मुकेशच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी यशविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दरम्यान मुकेश आणि यशमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद होता, हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासाअंती सत्य उघड होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.