Mumbai Crime : ते तसे नव्हतेच, अचानक चोऱ्या करत सुटले, असं काय घडलं त्यांच्या आयुष्यात ?

मुंबई ठाणे परिसरातून रिक्षा चोरणाऱ्या चौकडीस भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १८ रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Mumbai Crime : ते तसे नव्हतेच, अचानक चोऱ्या करत सुटले, असं काय घडलं त्यांच्या आयुष्यात ?
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 5:05 PM

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, भिवंडी या शहरांमधील रिक्षा चोरीच्या (autorikshaw theft) गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी पोलिस पथकांना याप्रकरणात विशेष लक्ष घालून शोधमोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई करत अखेर पोलिसांनी चार जणांच्या टोळीला (4 accused arrested) ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर या टोळीकडून तब्बल 20 लाख रुपयांच्या 18 रिक्षा जप्त करीत 12 गुन्ह्यांची उकल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत यासंदर्भात अधिक माहिती दिली. ज्या-ज्या भागांमधून रिक्षा चोरीला गेल्या होत्या, त्या भागांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज तपासण्यात आले. तसेच मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आणि खबरींनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीतील काहीजण भिवंडी शहरातील नदी नाका येथे रिक्षा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि त्या ठिकाणाहून चार जणांना ताब्यात घेतले. रशीद युनुस खान (वय 38, रा.अंधेरी) सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना (वय 38,रा.मुंब्रा), एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी (वय 42,रा मुंब्रा), जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी (वय 35, रा धुळे) अशी त्या चौघांची नावे आहेत. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडू ओशिवरा व जुहू पोलिस ठाणे हद्दीतून चोरी झालेल्या दोन रिक्षा जप्त केल्या. त्यांना ताब्यात घेतल्यावर अधिक तपास केल्यावर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण 18 रिक्षा जप्त केल्या.

रिकव्हरी एजंट म्हणून करत होते काम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींपैकी सय्यद शेख उर्फ मुन्ना, आणि एहतेशाम सिद्दीकी हे दोघे वाहन कर्जांचे हप्ते थकीत असलेली वाहने रिकव्हरी करणारे एजंट म्हणून काम करीत होते. पण काही कारणामुळे त्यांना रिकव्हरी कंपनीने काढून टाकले होते. एजंट म्हणून काम करत असताना, लॉक असलेली वाहने लॉक तोडून कशी सुरू करायचे, याची पद्धत त्यांना माहीत होती. त्यामुळे त्यांनी वाहन चोरीकडे मोर्चा वळवला.

अशा प्रकारे चोरी केलेल्या अनेक रिक्षा ते जमील तय्यब या धुळ्यातील सहकाऱ्याला विकायचे आणि पैस कमवायचे. तर जमील हा या चोरी केलेल्या रिक्षा धुळे,,नंदुरबार,जळगाव , मालेगाव या परिसरात विक्री करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.