Mumbai Crime : आधी पाठलाग, मग थेट घरात घुसून धमकीच दिली… त्या ‘रोमिओला’ पोलिसांनी दाखवला इंगा
आरोपीने पीडितेला सांगितले की तो अविवाहित आहे आणि त्याला तिचयासोबत मैत्री पुढे नेण्यात रस आहे. पीडितेनेही होकार दिला पण नंतर तिला त्याचं खरं रूप समजलं. आणि तिला धक्काच बसला.
मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : प्रेमात मिळालेला नकार सगळ्यांनाच पचवता येता नाही. काहीजणांचा त्यामुळे अहंकार दुखावतो आणि मग ते प्रेम मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. असाच एक प्रकार मुंबईतही उघडकीस आला आहे, जिथे एका इसमाने त्याच्या प्रेयसीला मिळवण्याच्या नादात तिलाच त्रास दिला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. पीडित महिला मुलुंडची रहिवासी असून आरोपीने तिचा पाठलाग करून, तिच्या घरात घुसून विनयभंग (physical assult) केल्याचा आरोप तिने लावला. सागर जयस्वाल असे आरोपीचे नाव आहे.
पीडितेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करताना 2021 साली तिची आणि आरोपीची ओळख झाली. कामाबद्दल बोलता बोलता हळूहळू त्यांची ओळख वाढली आणि त्याचे मैत्रीत रुपांतर झाले. आपले लग्न झाले नसल्याचे सांगत, तुझ्यासोबतची मैत्री पुढे न्यायला आवडेल असे आरोपी सागरने पीडितेला सांगितले होते. पीडित तरूणीलाही तो आवडत असल्याने तिने होकार दिला. मात्र त्याचे लग्न झाल्याचे तिला काही काळाने समजले आणि धक्काच बसला.
हे कळताची पीडितेने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. आरोपी मात्र तिच्या मागेच लागला होता. आपण दोघंही लग्न झालेल्या कपलसारखे राहूया, असा त्याचा आग्रह होता. तो सतत फोन आणि एसएमएस करून, कामाच्या ठिकाणी देखील तिला त्रास देत होता.
थेट घरातच घुसला
एवढं सगळं होऊनही पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिची कामावर बदनामी करण्याची धमकी दिली. तिने नंतर काम सोडले तरीही हे चालूच राहिले. 24 सप्टेंबर रोजी पीडिता तिच्या घरी असताना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपी जयस्वाल जबरदस्तीने तिच्या घरात घुसला. ” तूही माझ्यावर प्रेम कर ना” असे सांगत तिला पुन्हा पटवण्याचा प्रयत्न केला आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तुझ्याशी संबंध ठेवण्यात कोणताही रस नाही, असे पीडितेने त्याला पुन्हापुन्हा सांगितले तेव्हा मात्र तो भडकला आणि त्याने पीडितेचे लैंगिक शोषण केले. एवढेच नव्हे तर गावी जाऊन चॉपर आणि रायफल आणेन आणि तुझा जीव घेईन, अशी धमकीही आरोपीने तिला दिली.
याप्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी आरोपीला अचक केली. तो मूळचा भुसावळचा रहिवासी आहे मात्र सध्या मुंबईतील अंधेरी येथे राहते. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी, नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.