Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलआयसी एजंट असल्याचे सांगितले, फेक पॉलिसीही जमा केल्या, बँकेला ‘इतक्या’ कोटीचा चुना

सहा जणांनी बँकेकडे वाहन कर्जासाठी अर्ज केला. एलआयसी पॉलिसी तारण ठेवून सहा जणांनी कर्ज घेतले. मात्र कर्जाचे हफ्ते चुकले अन् भयंकर प्रकरण उघडकीस आले.

एलआयसी एजंट असल्याचे सांगितले, फेक पॉलिसीही जमा केल्या, बँकेला 'इतक्या' कोटीचा चुना
बनावट पॉलिसीद्वारे बँकेची करोडोची फसवणूकImage Credit source: tv9 network
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 12:16 PM

मुंबई : बनावट एलआयसी पॉलिसी सर्टिफिकेट जमा करुन तोतया एलआयसी एजंटने बँकेला करोडोचा चुना लावल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. आरोपीने पंजाब अँड सिंध बँकेची 1.32 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दादर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवूक प्रकरणी पोलिसांनी सोमवारी वसईतील हिस्ट्रीशीटर महिलेला अटक केली आहे. राणी दुराईराज पेरिनाबी असे या महिला आरोपीचे नाव आहे. महिलेविरुद्ध फसवणुकीचे असेच पाच गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात आणखी पाच आरोपींचा सहभाग असून, ते सर्वजण फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

कर्जाचे हफ्ते थकल्याने प्रकरण उघड

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कर्ज घेतले होते. मात्र सहा कर्जदारांनी कर्जाचे हफ्ते न फेडल्याने हे फसवणुकीचे प्रकरण उघड झाले. पोलिसांनी पेरिनाबीला अटक केली असून, तिच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. सोनाली बोरसे, वैशैली शिवगण, मनीष जैस्वाल, दीपक दान, रणजित प्रसाद आणि प्रकाश भेट अशी पाच फरार आरोपींची नावे आहेत.

बनावट एलआयसी पॉलिसीवर 1.32 कोटीचे कर्ज घेतले

एका फसवणूक करणाऱ्या टोळीने बनावट एलआयसी पॉलिसी सादर केल्याचा आरोप करून, बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात गुन्हा नोंदवला होता. आरोपींनी बनावट एलआयसी पॉलिसीद्वारे वाहन कर्ज घेतले आणि ते थकवले. दुराईराज पेरिनाबी आणि सोनाली बोरसे यांनी एलआयसी एजंट म्हणून बँकेशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांचा कर्जाचा अर्ज बँकेने फेटाळला होता. मग एप्रिल 2022 मध्ये, पेरिनाबी आणि तिच्या साथीदारांनी एलआयसी पॉलिसींवर कर्ज मागितले. प्राथमिक पडताळणीनंतर 1.32 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा