Mumbai Crime : त्या दिवसापासून तो कामावर आलाच नाही… वृद्धेला लुटणारा आरोपी कसा झाला जेरबंद ?

गुन्ह्याच्या दिवसापासून आरोपी त्याच्या कामावर गेलाच नव्हता, असे तपासादरम्यान पोलिसांसमोर आले. त्यानंतर त्यांनी अथक तपास करत आरोपीला शोधून काढले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

Mumbai Crime : त्या दिवसापासून तो कामावर आलाच नाही... वृद्धेला लुटणारा आरोपी कसा झाला जेरबंद ?
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 10:58 AM

मुंबई |23  सप्टेंबर 2023 : सोसायटीच्या, तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी बहुतांश ठिकाणी वॉचमन किंवा सेक्युरिटी गार्डची (security gurad) नियुक्ती केली जाते. दिवसा आणि रात्रीही चौकसपणे पहारा देऊन, बिल्डींगमधील रहिवासी, त्यांच्या गाड्या यांचं संरक्षण करणं हे यांचं मुख्य काम. जोखमीच असलं तरी अनेक सेक्युरिटी गार्ड्स हे काम अगदी चोखपणे करतात. पण रक्षणासाठी तैनात केलेली एखादी व्यक्तीच भक्षक बनली तर ? कुंपणानेच शेत खाल्ल्याचा असा प्रकार (crime news) घडल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

एका सेक्युरिटी गार्डने वृद्ध महिलेवर हल्ला करून 3 लाख रुपयांचे दागिने लुटल्याची (robbery) धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे घडली आहे. रात्रीच्या सुमारास दबक्या पावलांनी आलेल्या या आरोपीने महिलेवर हल्ला केला, आणि तिच्याकडील दागिने (gold ornaments theft) लुटून पोबारा केल्याचे समोर आले. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिाकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करत त्याला शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर येथील एका सोसायटीमध्ये ही दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली. राजेंद्र बहादुर कुमवार ( वय 42) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. 19 सप्टेंबर रोजी रात्रीच्या 10 वाजताच्या सुमारास पीडित वृद्ध महिला घरी एकटी असताना, एक अज्ञात व्यक्ती तिच्या घरात घुसली. त्याने त्या महिलेकडील सुमारे 3.20 लाखांचे दागिने लुटले आणि पळून जाण्यापूर्वी तिच्यावर जबरदस्ती करत हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.

या धक्कादायक घटनेनंतर नवघर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. वृद्ध महिलेवर हल्ला करत लूटमार करणाऱ्या आरोपीला शोधून जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम जारी केली. या केसचा तपास करताना पोलिसांनी गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आजूबाजूच्या रहिवाशांचीही चौकशी केली.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक महत्त्वपूर्ण तपशील पोलिसांच्या समोर आला. तो म्हणेज, ( लूटमारीच्या) घटनेननंतर आरोपी राजेंद्र हा कामावर आलाच नव्हता. यामुळेच संशय निर्माण झाला आणि त्याची अनुपस्थिती व लूट यांच्यातील संभाव्य दुव्याकडे पोलिसांचे लक्ष वेधले.

खबरी तसेच तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपी राजेंद्रला सालासर परिसरातून शोधून काढले आणि अटक केली. त्याच्याकडून लुटीचा माल, 3.20 लाख रुपये किमतीचे दागिनेही जप्त करण्यात आले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.