भाईंदर : मुंबई जवळ असलेल्या मीरा-भाईंदर येथील एका सोसायटीमध्ये अचानक वाद झाला. लोकांना हटवण्यासाठी पोलिसांना बल प्रयोग करावा लागला. वाद झाल्याच समजल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार, सोसायटीत राहणारा एक व्यक्ती कुर्बानीसाठी बकरा घेऊन आला होता. सोसायटीच्या सदस्यांचा याला विरोध होता. त्यावरुन हा सर्व वाद झाला. बघता, बघता घटनास्थळी दोन्ही बाजूने मोठा जमाव तिथे जमला.
दोन्ही गटांनी आपआपल्या लोकांना बोलावलं. दोन्ही बाजूकडून शाब्दीक बाचाबाची झाली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली.
लिफ्टमधून आणले 2 बकरे
सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी बकरा आणल्याचा आरोप आहे. सोसायटीने कुर्बानीची परवानगी दिली नव्हती. मात्र, तरीही जबरदस्ती लिफ्टमधून 2 बकरे आणल्याचा आरोप आहे. सोसायटीच्या सदस्यांना याबद्दल समजल्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व वादाची सुरुवात झाली. रात्री 11 वाजता परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.
लाठीचार्ज करावा लागला
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना लोकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. सध्या भागात तणाव आहे. घटनास्थळी पोलीस आहेत. दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे.