उसने घेतलेले दहा लाख रुपये परत देत नव्हते, पण जन्मदात्यांनी जे केले त्याने मुलाचा संसारच उद्धवस्त झाला !

| Updated on: Apr 29, 2023 | 5:19 PM

बापाकडून उसने घेतलेले पैसे मुलगा आणि सून परत देत नव्हते. यावरुन दररोड बाप आणि मुलामध्ये वाद होत होते. अखेर हा वाद विकोपाला गेला अन् अनर्थ घडला.

उसने घेतलेले दहा लाख रुपये परत देत नव्हते, पण जन्मदात्यांनी जे केले त्याने मुलाचा संसारच उद्धवस्त झाला !
मालाडमध्ये पैशाच्या वादातून सुनेला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

गोविंद ठाकूर, मुंबई : उसने घेतलेले पैसे मुलगा आणि सून परत करत नव्हते यामुळे संतापलेल्या माता-पिता आणि मुलीने सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडमधील मालवणी परिसरात घडली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आयेशा सय्यद असे मयत सुनेचे नाव आहे. दहा लाख रुपयांच्या देण्या-घेण्यावरुन मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्कॉटर कॉलनीत ही घटना घडली. मालवणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकबर सय्यद, रोकय्या सय्यद आणि गौरी सय्यद अशी आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

सासरा अकबर सय्यद याने मुलगा इरफान आणि सून आयेशा यांना घराच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये दिले होते. सहा महिने झाले तरी मुलाने पैसे परत केले नाही. यामुळे बापाने मुलगा आणि सुनेकडे पैशांची विचारणा केली. मात्र ते देत नव्हते. बाप वारंवार पैशाची मागणी करायचा, मात्र मुलगा आणि सून पैसे तर परत करतच नव्हते, पण त्यांच्याशी भांडण करायचे. यामुळे वाद वाढत गेला. आठवडाभरापूर्वीही पैशावरुन पुन्हा वाद झाला होता.

वादाचे हाणामारीत रुपांतर झाले

मात्र काल संध्याकाळी या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर सासू रोकय्या सय्यद आणि तिची मुलगी गौरी सय्यद यांनी सून आयेशाचे केस पकडून तिला जमिनीवर आपटले. त्यामुळे सून जखमी झाली. तरीही तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, यात आयेशाचा जागीच मृत्यू झाला. मालवणी पोलिसांनी सासरा अकबर सय्यद, सासू रोकय्या सय्यद आणि मेहुणी गौरी सय्यद यांना मालवणी येथून अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा