अभिनेता पुष्कर श्रोत्रीला मोठा धक्का, घरातील कामवालीनेच चोरला लाखोंचा ऐवज
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पु्ष्करने पोलिसांत धाव घेऊन फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : मराठी चित्रपटसृष्टील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री (pushkar shrotri) याला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेने १० लाखो रुपयांहून अधिक किमतीचे दागिने (theft at house) चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या घरातील लाखभर रुपयाची रोख रक्कम आणि फॉरेन करन्सी देखील (परदेशी चलन) चोरीला गेली आहे.
ही चोरी उघडकीस आल्यानंतर पुष्कर श्रोत्री याने पोलिसांत धाव घेत उषा घांगुर्डे आणि भानुदास घांगुर्डे या दोघांविरोधात फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पण पुष्कर श्रोत्री यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महिलेने दिली चोरीची कबूली
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, पुष्कर हा विलेपार्ले येथे राहतो. घरातील सर्व कामकाज करण्यासाठी आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी त्याने घरात तीन मदतनीस नियुक्त केले होते. त्यांच्यापैकी एक असलेल्या उषा घांगुर्डे (वय 41) ही महिला गेल्या 5-6 महिन्यांपासून त्याच्याकडे सकाळी 8 ते रात्री 8 असं १२ तास काम करत होती. तिने पुष्करच्या घरातून 1.20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 60,000 ची फॉरेन करन्सी चोरली.
22 ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजल हिला मदतीनस उषा हिच्या वागण्यावर संशय आला. त्यानंतर श्रोत्री दांपत्याने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. पोलिसांनी उषा हिची कसून चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबूली दिली. ते पैसे चोरून आपण पती, भानुदास घांगुर्डे याच्याकडे सोपवल्याचेही उषाने सांगितले. तिचा पती भानुदासनेही चोरीचे पैसे घेतल्याचे कबूल केले.
आणखी एक धक्का
मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबल नाही तर 24 ऑक्टोबर रोजी आणखी एक घटना उघडकीस आली. पु्ष्करची पत्नी प्रांजल हिने कपाटातून सोन्याचे दागिने काढले, मात्र तिला काहीतरी गडबड जाणवली. त्यांनी सोनाराकडे जाऊन ते दागिने दाखवले असता ते दागिने बनावट असल्याचं उघडकीस आलं. तपासादरम्यान असं उघड
दोन्ही घटनांमुळे हादरलेल्या पुष्कर श्रोत्री यांनी २६ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 34, 381, 406 आणि 420 अंतर्गत उषा आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.