‘त्या’ चिमुरड्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, दुसरे लग्न करण्यासाठी पित्यानेच…

माहिम खाडीजवळ बुधवारी सकाळी एका दोन वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत सायन रुग्णालयात नेला. पोलीस मुलाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत होते. तितक्यात मुलाची आई पोलीस ठाण्यात दाखल झाली.

'त्या' चिमुरड्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, दुसरे लग्न करण्यासाठी पित्यानेच...
पित्यानेच केली दोन वर्षाच्या मुलाची हत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 2:58 PM

मुंबई : सायन-माहीम लिंक रोड परिसरात सापडलेल्या लहान मुलाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. 22 वर्षीय तरुणाने विवाहबाह्य संबंधातून मुलाला जीवे मारले. ज्या तरुणीशी विवाहबाह्य संबंध ठेवले होते, त्या तरुणीने लग्नाआधी पत्नी आणि लहान मुलाचा कायमचा बंदोबस्त करण्याची अट घातली होती. तिचा शब्द पाळण्यासाठी तरुणाने आपल्या 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह प्लास्टिक पिशवीमध्ये भरून माहिम लिंकरोडवर फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या), 362 (अपहरण) आणि अन्य कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘असा’ झाला खुलासा

मुलगा बेपत्ता झाल्याने त्याचे नातेवाईक सकाळी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यासाठी गेले. यावेळी पोलिसांना मुलाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी मुलाच्या हत्येबाबत तपास सुरू केला. मुलाच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्याचे वडील धारावी झोपडपट्टीत राहत असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पोलिसांनी बापाला पकडले.

आरोपी कपड्याच्या कारखान्यात शिंपी म्हणून काम करत होता. तेथे त्याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र महिलेने त्याला अट घातली की, तिच्याशी लग्न करायचे असल्यास त्याला पत्नी आणि मुलाला त्याच्या आयुष्यातून काढावे लागेल. त्यानंतर आरोपीने मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

हे सुद्धा वाचा

आरोपी चॉकलेटचे आमिष दाखवून पत्नीकडून मुलाला घेऊन गेला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर मुलाचा मृतदेह माहीमच्या खाडीजवळ फेकून दिल्याचे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलाची आई आपल्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यास आल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.