Mulund Crime : भररस्त्यात तरूणाला बेदम मारहाण, रोख रक्कमही लुटली, तिघांचा शोध सुरू

गेल्या काही दिवसांपासून भररस्त्यात बदामाशांकडून लोकांना रोखून त्यांना मारहाण करण्याच्या, तसेच पैसे, मौल्यवान वस्तू लुटण्याच्या अनेक घटना वाढल्या असून त्यामुळे सामान्य नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. मुलंडमध्येही असाच काहीसा प्रकार घडला असून एका तरूणाला मारहाण करून लुटण्यात आले.

Mulund Crime : भररस्त्यात तरूणाला बेदम मारहाण, रोख रक्कमही लुटली, तिघांचा शोध सुरू
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 12:10 PM

मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : रस्त्यातून चालणेही आता मुंबईकरांसाठी अतिशय जोखीमचे बनले आहे. त्याचे कारण म्हणजे गुन्हेगारांचा हैदोस. गेल्या काही दिवसांपासून भररस्त्यात बदामाशांकडून लोकांना रोखून त्यांना मारहाण करण्याच्या, तसेच पैसे, मौल्यवान वस्तू लुटण्याच्या अनेक घटना वाढल्या असून त्यामुळे सामान्य नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. मुलुंडमध्येही असाच एक खळबळजनक प्रकार घडला असून एका तरूणाला तर भररस्त्यात मारहाण करू लुटण्यात आले आहे. याप्रकरणी तरुणाने नोंदवलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिराग मकवाना (वय 24) हा तरूण मुलुंडमधील विना नगर परिसरात वास्तव्यास आहे. गुरूवारी तो केशव पाडा विभागातून जात होता. त्यावेळी चार तरूणांनी त्याला रस्त्यात अडवले आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर त्या बदमाशांनी चिराग याच्याकडील रोख रक्कम खेचून घेतली. मात्र त्याच्याकडे जास्त पैसे नसल्याने आरोपींनी त्याला धमकावत ऑनलाइन रक्कम देण्यास भाग पाडले. त्यानंतर ते चौघेही तिथून फरार झाले.

हादरलेल्या चिरागने कसेबसे मुलुंड पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून शुभम परमार, जिग्नेश परमार, राहुल वाघेला आणि आकाश मोरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

यापूर्वीही घडली अशीच घटना, गोवंडी परिसरात तरूणाला झाली होती मारहाण

रस्त्यात मारहाण करून लुटण्याचे मुंबईतील हे काही पहिलेच प्रकरण नाही. काही दिवसांपूर्वीच गोवंडीजवळही असाच प्रकार घडला. मित्राला भेटून घरी परत जाणाऱ्या तरूणाला अज्ञातांनी रोखून त्याच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली होती. एवढेच नव्हे तर त्याला मारहाण करून त्याच्याकडून १० हजार रुपये लुटून ते फरार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूण सरफराज शेख (वय २२) हा चेंबूरच्या वाशीनाका परिसरात राहतो. मित्राला भेटल्यानंतर दुचाकीवरून तो घरी परत जात होता. याच वेळी वाशीनाका परिसरातील नागाबाबा नगर येथे अचानक चार तरूण त्याच्या दुचाकीसमोर आले. त्यांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला गोवंडी परिसरात नेऊन बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्या तरूणांनी सरफराज याच्याकडील १० हजार रुपयांची रोख रक्कम खेचून घेतली आणि पैसे घेऊन ते लगेचच तिथून फरार झाले. मारहाणीत जखमी झालेल्या सरफराजने कसेबसे आरसीएफ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांसमोर सर्व प्रकार कथन करत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.