अभिनेता अक्षय कुमारच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न, खिलाडी कुमारचं नाव वापरून तरूणीला गंडवलं..
आजकाल फसवणुकीचे प्रकार खूव वाढले आहेत. मोबाईलवरून लिंक अथवा मेसेज पाठवून तसेच ऑनलाइन माध्यमातून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते, ज्यामुळे त्यांना मोठा फटका बसतो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे, ज्यामध्ये चक्क बॉलिवूडच्या एका नामवंत अभिनेत्याच्या नावाचा वापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आजकाल फसवणुकीचे प्रकार खूव वाढले आहेत. मोबाईलवरून लिंक अथवा मेसेज पाठवून तसेच ऑनलाइन माध्यमातून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते, ज्यामुळे त्यांना मोठा फटका बसतो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे, ज्यामध्ये चक्क बॉलिवूडच्या एका नामवंत अभिनेत्याच्या नावाचा वापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हो, हे खरं आहे.
अभिनेता अक्षय कुमार याच्या नावाने एका तरूणीला फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिषही तिला दाखवण्यात आलं. मात्र सुदैवाने त्या तरूणीने हुशारी दाखवत अक्षय कुमारच्या मॅनेजरशी संपर्क साधला तेव्हा तिला फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. अखेर तिने भामट्याचे बिंग फोडले आणि जुहू पोलिसांनी त्याला अटक केली.
काय आहे प्रकरण ?
पूजा आनंदानी असे तरूणीचे नाव असून ती खार यथील रहिवासी आहे. 3 एप्रिल रोजी पूजा हिला व्यक्तीचा फोन आला. केप ऑफ गुड होप फिल्स या अभिनेता अक्षय कुमारच्या कंपनीतून बोलत असून आपले नाव रोहन मेहरा असल्याचे त्याने पूजाला सांगितलं. निर्भया केसवर आधारित एक चित्रपट येत असून महत्वाच्या भूमिकेसाठी तुमची निवड करण्यात आल्याचे त्या व्यक्तीने पूजा हिल सांगितलं. तसेच त्याने पूजाला विलेपार्ले येथील इस्कॉन मंदिराजवळ भेटण्यासाठी बोलावले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी आरोपीने सोबत पटकथा लिहून आणली होती. खाली अभिनेता अक्षय कुमारची स्वाक्षरी असल्याचेही त्याने नमूद केले.
नामवंत कलाकारांच्या भूमिका असलेल्या चित्रपटात कामाचे दाखवले आमिष
या आगामी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसह अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका असल्याचे आरोपीने पूजा यांना सांगितलं. या पटकथेतील इतर कोणतीही स्त्री पात्र निवड, असा ऑप्शन पूजाला देण्यात आला. त्याप्रमाणे तिने एका भूमिकेची निवड केली. तुझं वजन थोडं अधिक आहे ते कमी करावं लागेल, असं त्याने पूजाला सांगितलं. एवढंच नव्हे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या छायाचित्रकाराकडून फोटो काढण्याचा सल्ला दिला. त्यासाठी सहा लाख रुपये लागतील, असेही त्याने सांगितली.
असं फुटलं बिंग
मात्र ही रक्कम खूप मोठी असून आधी घरच्यांशी बोलावं लागेल असं पूजाने त्याला सांगितलं. घरी आल्यावर 5 एप्रिल रोजी पूजाने अक्षय कुमारच्या स्वीय सहाय्यकाशी झिनोबिया कोहला याच्याशी संपर्क साधून चौकशी केली. तेव्हा, रोहन मेहरा नावाची कोणतीच व्यक्ती केप ऑफ गुड होप्स मध्ये काम करत नसल्याचे तिला समजले. आपली फसवणूक होत असल्याचे पूजा हिच्या लक्षात आलं आणि तिने त्या भामट्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानंतर रोहन मेहराने तिला पुन्हा कॉल केला.तेव्हा पूजाने तिला जुहू येथील हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. त्यानुसार मंगळवारी पूजा, तिचे वडील व पोलीसांचं पथक या हॉटेलमध्ये पोहोचलं. तेथे भामटा रोहन मेहरा येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्या भामट्याचं खरं नाव प्रिन्सकुमार राजन सिन्हा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली असून आहे. तसेच त्याच्याविरोधात फसवणूक आणि तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.