सावधान, तुम्हीही बियर बारमध्ये ATM कार्ड स्वाईप करताय?

बियर बारमध्ये कॅशियर आणि दोन वेटर ग्राहकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचं क्लोनिंग (ATM card cloning) करून पैसे काढताना पकडले.

सावधान, तुम्हीही बियर बारमध्ये ATM कार्ड स्वाईप करताय?
ATM कार्ड क्लोनिंग करणारे आरोपी अटकेत
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 6:09 PM

मुंबई : बियर बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना खडबडून जागं करणारी घटना मुंबईत घडली आहे. बियर बारमध्ये कॅशियर आणि दोन वेटर ग्राहकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचं क्लोनिंग (ATM card cloning) करून त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढत असताना सापडले आहेत. पोलिसांनी मालाडमधील या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Mumbai Police arrested Beer bar waiters for ATM card cloning)

मुंबईतील मालाड पोलिसांनी तीन बियर बारमधील एका कॅशियरसोबतच 2 वेटर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 क्लोनिंग मशीनसोबतच लॅपटॉप, ATM कार्ड आणि ग्राहकांचे ATM पिन नंबर लिहिलेले कागद हस्तगत केले आहेत.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना कलम 419, 420, च्या आलावा 66 क, ड, अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मालाड (प ) चिंचोली बंदरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यावर ही कारवाई करण्यात आली.

संबंधित तक्रारदाराच्या खात्यातून ATM न वापरताही पैसे कट होत होते. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर, बियरबारमधील भामटे हा कारनामा करत असल्याचं उघड झालं. (Mumbai Police arrested Beer bar waiters for ATM card cloning)

कार्डचा वापर करताना ‘या’ बाबी ठेवा लक्षात

जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्डचा वापर करत असाल तर कॅमेऱ्याकडे लक्ष असुद्या. त्याद्वारे कोणी तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत नाही ना, याची काळजी घ्या. PoS मशिनींमध्ये कार्डचा पिन टाकताना आपल्या हाताने मशीन झाकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखाद्या हॉटेल, पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी पीओएस मशिनद्वारे कार्ड स्वाईप करत असाल आणि मशीन जर जास्त वजनाची लागत असेल तर तातडीने त्याची तपासणी करा.

तुम्हाला येणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवा

कार्डने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल फोनवर व्यवहार केल्याचा मेसेज नाही आला तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा. याशिवाय बँकेतून येणारा प्रत्येक मेसेज काळजीपूर्वक वाचा आणि तो तपासा. यासंबंधीची अधिक माहिती तुम्ही बँक स्टेटमेंटमधूनही घेऊ शकता.

संबंधित बातम्या 

Alert | ATM कार्ड वापरताय ?, मग SBI ने सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा    

एका चुकीमुळे गमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते ATM कार्ड क्लोनिंगमधून चोरी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.