Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कामरान खान असे आरोपीचे नाव असून त्याला मुंबईतील सायन परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या.

पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावर्षी चांगलेच चर्चेत राहिले. त्यांनी सुरु केलेली बुलडोझर कारवाई यावर्षीही सुरूच होती. फेब्रुवारी 2023 मध्ये प्रयागराजमध्ये उमेश पाल हत्याकांडानंतर त्यांनी विधानसभेत दिलेले विधान अजूनही चर्चेत आहे. उमेश पाल खून प्रकरणात माफिया अतिक अहमदचे नाव समोर आले होते. विधानसभेत झालेल्या गदारोळात योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, या माफियाला नेस्तनाबूत करण्याचे काम त्यांचे सरकार करेल. हळुहळू योगी सरकारने अतिक आणि त्याच्या साथीदारांवर मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. उमेश पाल खून प्रकरणात सहभागी असलेला अतिकचा मुलगा पोलीस चकमकीत मारला गेला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस कोठडीत असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 1:23 PM

मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कामरान खान असे आरोपीचे नाव असून त्याला मुंबईतील सायन परिसरातून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.

रिपोर्ट्सनुसार, सोमवारी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याचे त्याने म्हटले होते.तसेच त्याने जेजे हॉस्पिटल उडवण्याचीही धमकी दिली होती.

चुनाभट्टी येथून अटक

या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने धमकीचा कॉल करणाऱ्या त्या आरोपीचा शोध सुरू केला. अखेर बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी आरोपी कामरान याला चुनाभट्टी परिसरातून बेड्या ठोकत अटक केली. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी कामरान खान या तरुणाविरुद्ध भादंवि कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस त्याची कसून चौकशी करत असून अधिक तपासही सुरू असल्याचे समजते.

दाऊदचं सांगितलं नाव

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केलेल्या कॉलदरम्यान कामराने याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचेही नाव घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याचे त्याने म्हटले. एवढेच नव्हे तर आपण, मुंबईतील जेजे हॉस्पिटलही उडवू, अशी धमकी देखील त्याने फोनवरून दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

यापूर्वीही पंतप्रधानांना मिळाली धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. काही काळापूर्वी दिल्लीतील दक्षिणपुरी भागातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला होता. आपण पंतप्रधान मोदी यांचा जीवे मारणार आहोत, अशी धमकी त्याने फोनवरून पोलिसांना दिली. त्यानंतर मोठी खळबळ माजली. पोलिसांनी तातडीने शोधमोहिम सुरू करत धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढलं खरं. पण तेव्हा तो आरोपी नशेत असल्याचं आढळलं.  तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आत्तापर्यंत दोनदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....