मुंबई पोलिसांना सॅल्यूट | ‘जामतारा’मधून सर्वसामान्यांच्या बँक अकाऊंटमधून OTP मागून पैसे लुटणारे जेरबंद

व्हेरिफिकेशनच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या टोळीतील तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. देशात कुप्रसिद्ध असलेल्या आणि पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या जामतारा टोळीपर्यंत मुंबई पोलीस पोहचलेच.

मुंबई पोलिसांना सॅल्यूट | 'जामतारा'मधून सर्वसामान्यांच्या बँक अकाऊंटमधून OTP मागून पैसे लुटणारे जेरबंद
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या जामतारा गँगच्या तिघांना बेड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 9:20 PM

गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : तुमच्या खात्याला लॉटरी लागली आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्स्पायर होणार आहे, अशी बतावणी करत लोकांचे कार्ड नंबर घेऊन त्यांचे बँक खाते खाली करणे. सामान्य लोकांचे युजरनेम, पासवर्ड आणि ओटीपी घेऊन ते त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढतात. मोबाईलवर अनेक प्रकारचे मॅसेज येतात जे तुम्हाला OTP शेअर करण्यास सांगतात. एकदा ओटीपी शेअर केल्यावर डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर लोकांचे बँक खाते रिकामे करतात आणि हे सर्व करणारी कुप्रसिद्ध टोळी म्हणजेच ‘जामतारा‘ गँग. झारखंडची राजधानी रांचीपासून 225 किमी अंतरावर असलेल्या जामतारा येथून ही सायबर गँग सक्रिय आहे. या टोळीवर नेटफ्लिक्सवर एक सिरिअयल देखील आली आणि खूप लोकप्रिय झाली. या लोकांना आवाक्यात आणणे कठीण असल्याचं या सिरियलमध्ये दाखवण्यात आलं आहे. असे असले तरी मुंबई पोलिसांनी ही कामगिरी बजावून दाखवली आहे. झारखंडच्या जामतारामध्ये जावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जामतारातून आवळल्या आरोपींच्या मुसक्या

ब्लू डर्ट कुरिअर कंपनीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी जामतारा झारखंड येथून अटक केली आहे. या आरोपींकडून 11 मोबाईल आणि 1 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सरफान अब्दुल मनान अन्सारी, मोहम्मद सय्यद शफीक अन्सारी, गुलजार अन्वर अन्सारी हे सर्व जामतारा झारखंडचे रहिवासी आहेत. हे सर्व आरोपी सायबर ठग आहेत.

एका नागरिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

एका नागरिकाने कांदिवली पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपी झारखंडमधील जामतारा येथील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पोलिसांनी पोलीस पथके तयार केली अन् झारखंडला रवाना झाले.

हे सुद्धा वाचा

एनी डेस्क अॅप डाऊनलोड करुन पैसे लुटले

ज्यांना आवाक्यात आणणं कठिण असं म्हटलं जातं, त्या जामतारा टोळीच्या तिघांच्या मुसक्या आवळण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. तक्रारदाराने ब्लू डार्ट कुरिअरने एक पार्सल पाठवले होते. यानंतर आरोपींनी त्यांना ब्लू डार्ट कंपनीचे कस्टमर केअर कर्मचारी म्हणून फोन केला. त्यानंतर पडताळणीच्या नावाखाली तक्रारदाराकडून एनी डेस्क अॅप डाऊनलोड करुन तक्रारदाराच्या खात्यातून काही मिनिटात 1 लाख 70 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.

कांदिवली पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या टीममध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे, याची चौकशी पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.