Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMOच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आणि सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई पोलिसांची कामगिरी

2 लाख रुपयांचं कर्ज मिळेल असं सांगत ही जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीला हजारो लोक फसले आणि त्यांची तब्बल 4 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे

PMOच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आणि सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई पोलिसांची कामगिरी
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 2:41 PM

मुंबई : पंतप्रधान कार्यालयाकडून कर्ज मिळवून देतो असं सांगत बनावट अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. संजीव कुमार नावाच्या अलिगढ इथल्या आरोपीने 9 अॅप्लिकेशन्स तयार केले, काही वेबसाईट्स बनवल्या, तसंच काही वृत्तपत्रांना जाहिरातीही दिल्या. 2 लाख रुपयांचं कर्ज मिळेल असं सांगत ही जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीला हजारो लोक फसले आणि त्यांची तब्बल 4 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. (Mumbai Police Crime Branch exposes two rackets for cheating citizens)

2 लाख 80 हजार लोकांकडून अॅप्लिकेशन डाऊनलोड

पंतप्रधान कार्यालयाकडून कर्ज मिळवून देतो असं सांगत तयार करण्यात आलेले अॅप्लिकेशन्स तब्बल 2 लाख 80 हजार लोकांनी डाऊनलोट केलं. ते रजिस्टर करुन त्यात स्वत:ची माहितीही भरली. प्रत्येकाला ८, १० किंवा 20 हजार रुपयांची रक्कम भरायला लावली. लोकांनी ही रक्कम भरताच आरोपी गायब झाले. यासाठी एक कॉलसेंटर ऑपरेट केलं जात होतं. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाची अशी कोणतीही योजना नसताना, खोटी माहिती सांगत लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.

अजून काही लोकांच्या फसवणुकीची शक्यता

या प्रकरणात एकूण 4 लोकांना अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी स्वत: हे अॅप्लिकेशन ट्रॅक करुन त्याचा उलगडा केलाय. पोलिसांनी केलेल्या तपासात किमान 4 हजार लोकांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या लोकांची फसवणूक झाली त्यांच्याकडून जवळपास 4 कोटी रुपये हडप केल्याचं सांगण्यात येत आहे. खोट्या जाहिरातीला बळी पडून कित्येक लोकांनी आपली खासगी माहिती आणि कागदपत्रे या अॅप्लिकेशन्सवर अपलोड केल्यामुळे येत्या काळात अजून काही लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे फसवणूक टाळायची असेल तर अशा कोणत्याही अॅप्लिकेशन्सवर लोकांनी आपली माहिती भरु नये. लिंक किंवा वेबसाईट खरी आहे की खोटी हे व्हेरिफाय केल्याशिवाय लोकांनी अशा कुठल्याही जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहान पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

सेक्सटॉर्शन रॅकेटचाही पर्दाफाश

मुंबई क्राईम ब्रँचच्या सेलने अजून एका महत्वाच्या केसचा उलगडा केलाय. सेस्कटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भागातून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आरोपी रिसर्च करतात. महत्वाच्या लोकांचा डेटा मिळवतात. आमदार, खासदार, आयपीएस अधिकारी, आयएएस अधिकारी यांना टार्गेट केलं जातं.

सोशल मीडियावर एक बनावट अकाऊंट ओपन करुन त्यावर सुंदर मुलीचा प्रोफाईल फोटो ठेवला जातो. या प्रकरणात पूजा शर्मा नावाने अकाऊंट बनवण्यात आलं होतं. या अकाऊंटवरुन अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मग प्रतिष्ठीत लोकांना मेसेज पाठवून एखाद्या दिवशी व्हिडीओ कॉल केला जातो. तो उचलला जाताच त्यावर पॉर्न क्लिप क्लिप लावल्या जातात. समोरचा व्यक्ती अनावधानाने व्हिडीओ पाहत राहतो आणि हे सगळं रेकॉर्ड केलं जातं. त्यानंतर आरोपींकडून त्या व्यक्तीला कॉल करुन खंडीणीची मागणी केली जाते. सुरुवातीला ब्लॅकमेल करुन कमी रक्कम मागतात. पुढे ही मागणी वाढत जाते. अशाप्रकारे लोकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केला आहे.

संबंधित बातम्या :

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या भामट्याला अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

मुंबईत ड्रग्स तस्करीसाठी माफियांचा नवा मार्ग, थेट निराधार महिलांचा वापर, एनसीबीकडून मोठी कारवाई

Mumbai Police Crime Branch exposes two rackets for cheating citizens

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.