मुंबईतील फुटपाथवर पेट्रोल डिझेलची अवैध विक्री, पोलिसांकडून पर्दाफाश

फुटपाथवर एका कंटनेरमध्ये सुरु असलेल्या डिझेल विक्रीचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. (Mumbai Police Destroyed Diesel sales racket)

मुंबईतील फुटपाथवर पेट्रोल डिझेलची अवैध विक्री, पोलिसांकडून पर्दाफाश
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 8:18 PM

मुंबई : मुंबई पोलिसांनी पेट्रोल डिझेल विक्रीच्या रॅकेटचा पदार्फाश केला आहे. यावेळी धारावी आणि मोहिम या ठिकाणी फुटपाथवर एका कंटनेरमध्ये सुरु असलेल्या डिझेल विक्रीचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. त्यांच्याकडून जवळपास 14 हजार लीटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Police Destroyed Petrol Diesel Pump racket)

मुंबईच्या फुटपाथवरील फेरीवाले तुम्ही बघितले असतील. पण फुटपाथवर फेरीवाल्यांकडून पेट्रोल पंप चालवला जात आहे. पण मुंबईच्या फुटपाथवर डिझेल विकले जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने धाड़ टाकत त्यांच्यावर कारवाई केली.

राजेंद्र ठाकूर MS वेस्ट केयर (WEST CARE) कंपनीला क्लीन अप कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेकडून देण्यात आलं होतं. यासाठी 150 गाड्या लागणार होत्या. या गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी चक्क फूटपाथवरच कंटेनर टाकून त्याच्या आतमध्ये डिझेलची टाकी बसवण्यात आली होती.

माहिम आणि धारावी येथील फूटपाथवर जवळपास 150 गाड्यामध्ये या कंटेनरद्वारे डिझेल भरले जात होते. यावर कारवाई करत मुंबई पोलिसांनी 14 हजार लीटर डिझेल जप्त केलं. त्याशिवाय एमएस वेस्ट या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या राघवेंद्र ठाकूरला अटक केली. या कंपनीचे डायरेक्टर सध्या फरार आहेत. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहे.

अधिकृत पेट्रोल पंपवरुनच पेट्रोल-डिझेलची खरेदी 

दरम्यान या प्रकरणानंतर पेट्रोल आणि डिझेल अधिकृत पेट्रोल पंपवरुनच खरेदी करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणीही गैररित्या पेट्रोल किंवा डिझेल भरु नये. जर कोणी असं अनधिकृत काम करत असेल तर अशा लोकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Mumbai Police Destroyed Petrol Diesel Pump racket)

संबंधित बातम्या : 

तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

पोलीस बनले समलैंगिक; 16 तरूण, 3 तरुणींना लूटणारी महिला गजाआड!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.