लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

आरोपीने पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा दुष्कर्म केल्याचा दावा केला जातो (Mumbai Police raped pretext of marriage)

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा
लग्नाच्या आमिषाने महिला पोलिसावर बलात्कार केल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 2:50 PM

मुंबई : लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. (Mumbai Police officer allegedly raped lady officer on pretext of marriage)

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा दुष्कर्म केले. जेव्हा पीडितेने लग्नाची विचारणा केली, तेव्हा त्याने उघडपणे नकार दिला. एवढंच नव्हे तर आरोपीच्या घरातील दोघा जणांविरुद्ध पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पोलीस अधिकारी मुंबईत तैनात

महिलेच्या तक्रारीनुसार डोंगरी पोलिसांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात कलम 376, 376 (2), (एन), 354 (बी), 377, 420, 323, 504, 506 तसेच अ‍ॅट्रॉसिटी अॅक्ट 3(1) (डब्ल्यू) (i) (ii), 3 (2) (5) 3 (2) ( 537) 3 (1) (आर) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. लवकरच पोलिस आरोपीचाही जबाब नोंदवतील. आरोपी मुंबईतील एका पोलिस ठाण्यात तैनात आहे.

अहमदनगरमध्ये पोलीस भरतीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

इन्स्टाग्रामद्वारे महिलेशी ओळख करुन तिला पोलीस भरती आणि लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार गेल्याच महिन्यात घडला होता. आरोपीने आपण पोलीस असल्याचं सांगत या महिलेला पोलीस भरतीचं आमिष दाखवलं. तिच्याशी शारीरिक संबंध जोडले. तसंच लग्नाचं आमिष दाखवत मारहाण केल्याची तक्रार पीडित महिलेकडून करण्यात आली होती. या महिलेच्या तक्रारीवरुन अहमदनगरमधील राहता पोलिस ठाण्यात तोतया पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Mumbai Police officer allegedly raped lady officer on pretext of marriage)

बलात्काराच्या आरोपानंतर महिला पोलिसाची आत्महत्या

मुंबईतील सार्वजनिक बांधकाम अभियंत्याविरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. 47 वर्षीय महिला पोलीस हवालदाराने पिंपरी चिंचवडमध्ये आयुष्य संपवलं होतं. मृत्यूच्या पंधरा दिवस आधी संबंधित महिलेने वरळी पोलिसात बलात्काराची तक्रार नोंदवली होती.

संबंधित बातम्या :

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

पोलीस भरतीचं आमिष दाखवत तोतया पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार आणि फसवणूक

(Mumbai Police officer allegedly raped lady officer on pretext of marriage)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.