‘सुरक्षा वाढवा, अन्यथा…’ रतन टाटा यांना आला धमकीचा कॉल

उद्योगपती रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा त्यांची टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री सारखी अवस्था करण्यात येईल असे म्हटले होते. या तरुणाचा कॉल कर्नाटकातून आला होता. परंतू तो तरूण पुण्याचा रहाणारा असून एमबीए असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. परंतू....

'सुरक्षा वाढवा, अन्यथा...' रतन टाटा यांना आला धमकीचा कॉल
RATAN TATAImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 4:42 PM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांना धमकीचा फोन आल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. याआधी अनेक उद्योगपती आणि बॉलीवूड हस्तींना अशा प्रकारचे धमकीचे कॉल आल्याचे उघडकीस आले होते. रतन टाटांना धमकी देणाऱ्या तरूणाने टाटांची सुरक्षा वाढविण्यात यावी अन्यथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांची जी अवस्था झाली ती होईल असा गर्भित इशारा दिल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास केला. त्यानंतर जे सत्य उघडकीस आले त्यातून वेगळीच माहीती समोर आली आहे.

याआधी अनेक उद्योगपती आणि बॉलीवूड स्टारना धमक्या आल्या आहेत. परंतू रतन टाटा यांना प्रथमच एका तरूणाने अशा प्रकारची धमकी दिल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्री यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात मृत्यू झाला होता. रतन टाटा यांना धमकी आल्यानंतर पोलिसांनी रतन टाटा यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करीत विशेष टीमची स्थापना केली. तर दुसऱ्या टीमकडे धमकीचा तपास सोपविला. कॉलरचा तपास केला असता टेलिफोन विभागाच्या मदतीने त्याचे लोकेशन कर्नाटक असल्याचे उघड झाले. तो तरूण पुण्याला राहणारा असल्याचे तपासात उघडकीस आले.

एमबीए तरूणाचे कृत्य

पोलिस या तरुणाच्या पुणे येथील घरात पोहचली तेव्हा फोन करणारा व्यक्ती गेल्या पाच दिवसांपासून घरातून गायब असल्याचे कळले. त्याच्या पत्नीने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या नातेवाईकांच्या चौकशीतून हा तरुण स्क्रिझोफेनियाने त्रस्त असल्याचे उघडकीस आले आहे. या तरूणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून रतन टाटा यांना धमकी दिली. चौकशीत या प्रकरणातील आरोपी तरूणाची मानसिक अवस्थापाहून त्याच्यावर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. विशेष या तरूणाने फायनान्समध्ये एमबीए केले आहे आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास देखील केला असल्याचे उघडकीस आले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.