तिघांचा पाय घसरला, पाण्याची पातळी पाहून लोकांना घाम फुटला, मदतीसाठी गेलेल्या लोकांनी…

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे काही पर्यटन ठिकाणी धबधबे प्रवाहीत झाले आहेत. शासनाने अति पाण्यात जाऊ नका असा आदेश दिल्यानंतर सुध्दा काही पर्यटक आदेश जुमानत नसल्याचं दिसत आहे.

तिघांचा पाय घसरला, पाण्याची पातळी पाहून लोकांना घाम फुटला, मदतीसाठी गेलेल्या लोकांनी...
मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 8:55 AM

लोणावळा : पुणे जिल्ह्यातील लोणावळा (PUNE, LONAVALA) लगतच्या वरसोली गावात वर्षा विहारासाठी आलेल्या मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून (TWO TOURIST DEATH) मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रियांक व्होरा आणि विजय यादव अशी त्या दोघांची नावं आहेत. त्यांचा अचानक बुडून मृत्यू झाल्यामुळे सोबत असलेल्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून पुणे (TODAY PUNE NEWS) जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी काल अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली आहे.

बुडत असल्याचे पाहून इतर मित्रांनी आरडाओरड केली

लोणावळा परिसरात सलग सुट्ट्या आल्याने काही मित्रांचा ग्रुप वर्षाविहारासाठी आले होते. त्यांनी लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावातील खाणीत पावसामुळे पाणी होते. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास प्रियांक आणि विजय यादव या दोघांसह काही सहकारी पाण्यात उतरले. पाण्यात तिघेजण पुढे गेल्यानंतर त्यांचे पाय घसरले, ते बुडत असल्याचे पाहून इतर मित्रांनी आरडाओरड केली. परंतु त्यापैकी एकाला वाचवण्यात तिथल्या स्थानिकांना यश आलं.

उशिर झाल्यामुळे दोघांचा जागीचं मृत्यू

तिथं तात्काळ दाखल झालेल्या रेसक्यु टीमने बुडलेल्या दोघांना बाहेर काढले. परंतु उशिर झाल्यामुळे दोघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. एका युवतीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दहावीच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाले आहेत. मागच्या सहा तासांपासून शोध मोहीम सुरू आहे. अद्याप दोघांचा मृतदेह सापडलेला नाही. मागच्या आठदिवसात कोकणात अधिक पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीला पाणी अधिक असल्यामुळे त्याचे मृतदेह लांब गेले असल्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुट्टीच्या दिवशी नदीच्या डोहात आंघोळ करणे, त्यांचा अंगलट आले आहे. अतिक बेबल आणि अब्दुल लसने अशी बेपत्ता दोन मुलांची नावे आहेत. दोन्ही मुलांचा शोध पोलिस आणि इतर टीम घेत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.