नारायण राणेंच्या नावाचा गैरवापर करत महिलेची 45 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली . त्यानुसार गुन्हा दाखल करत वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

नारायण राणेंच्या नावाचा गैरवापर करत महिलेची 45 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
नारायण राणेंच्या नावाचा गैरवापर करून 45 लाखांची फसवणूक
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 10:49 AM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे (Naarayan Rane) यांच्या नावाचा गैरवापर करून एक महिलेची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्सोवा येथे ही घटना घडली असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांन याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पीडित महिलेच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली आरोपींनी महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही 51 वर्षांची असून ती अंधेरी येथे राहते, ती एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्यांना 23 वर्षांची मुलगी असून तिने ऑक्टोबर 2020 साली नीट परीक्षेत 315 गुण मिळवले होते. सध्या ती मुलगी बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. पीडित महिला ही मार्च 2021 मध्ये त्यांच्या मुलीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. तेव्हाच त्यांची भेट त्यांची जुनी मैत्रिण मेघना सातपुते हिच्याशी झाली.

मेघना सातपुते यांनी तक्रारदार महिलेची, नितेश पवार व राकेश गावडे यांच्याशी ओळख करून दिली. ते दोघे सिंधुदुर्गातील एका वैद्यकीय शाळेचे विश्वस्त असल्याची बतावणी त्यांनी यावेळी केली. तुमच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश मिळवून देतो, असे आमिष त्यांनी तक्रारार महिलेला दाखवले, आणि त्यासाठी 15 लाख रुपये मागितले. पीडित महिलेने ते पैसे दिले खरे, पण त्यानतंरही तिच्या मुलीला काही प्रवेश मिळाला नाही.

कोरोनामुळे लॉकडाऊन लागला, त्यामुळे आता सर्व नियम बदल्यामुळे प्रवेशासाठी आणखी पैसे लागतील, असे सांगत त्या लोकांनी तक्रारदार महिलेकडून तब्बल 45 लाख रुपये उकळले. त्यानंतरही डिसेंबर 2021 मध्ये कॉलेज सुरू होईल असे सांगण्यात आले. पण महिलेला किंवा तिच्या मुलीला कोणतेही पेपर्स, ॲडमिशनचे पत्र वगैरे काहीच दिले नाही. त्यांचं वागणं पाहून महिलेला संशय आला, आणि तिने संबंधित कॉलेजशी संपर्क साधून चौकशी केली. मात्र तिच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेशच मिळाला नसल्याचे तेव्हा स्पष्ट झाले आणि त्या महिलेला मोठा धक्का बसला.

त्यावेळी तक्रारदार महिलेने आरोपींशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही, त्यांचे मोबाईलही बंद होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आलं आणि तिने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये धावे घेत तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.