मुंबई: चोरीच्या संशायमुळे बेदम मारहाण करत तरुणाची हत्या, 6 जणांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी 6 कामगारांना अटक केली आहे. (Santacruz worker beaten Case)

मुंबई: चोरीच्या संशायमुळे बेदम मारहाण करत तरुणाची हत्या, 6 जणांना अटक
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 8:25 PM

मुंबई : मुंबईत सांताक्रूझ परिसरातील स्वामी मुक्तनंद पार्कमध्ये काम करत असलेल्या कामगारांनी एका 30 वर्षीय तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत त्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 कामगारांना अटक केली आहे. (Santacruz worker beaten Case)

सांताक्रूझ येथे काम करणाऱ्या 30 वर्षीय सैजाद खान यांची चोरीच्या संशयावरुन हत्या करण्यात आली आहे. सांताक्रूझ पश्चिमेकडे स्वामी मुक्तानंद पार्क या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. पालिकेने हे काम खासगी ठेकेदाराला दिलं आहे. या ठिकाणी काम करणारे उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगार आहेत.

शुक्रवारी 25 डिसेंबरच्या रात्री कामगार झोपले असता त्या ठिकाणी सैजाद खान आला. त्याने यातील एका कामगाराचा मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन त्याला पार्कच्या बाहेर असलेल्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या जखमी अवस्थेत तो जवळ असलेल्या घराजवळ एका रिक्षात झोपला. त्यानंतर त्याच्या परिवाराला सैजाद जखमी असल्याची माहिती दिल्यावर वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला त्यापूर्वी मृत घोषित केलं.

या प्रकरणी सैजादच्या भावाने तो नशा करत होता, हे मान्य केलं आहे. पण तो चोरी करत नव्हता. तसेच त्याच्यावर चोरीचा आरोपही सिद्ध झाला नव्हता अस सांगितलं. तर सैजादचा भाऊ याच्या तक्रारीवरुन सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

1. ऋषिकेश रामनिवस पासी (24) 2. हयात अब्दुल लतीफ अली (26) 3. अलीमुद्दीन सजरुद्दीन शेख (24) 4. मोतीबुर रहमान अख्तर आलम (19) 5. मस्कर आलम फरोजुद्दीन (18) 6. पिंटूकुमार कमेश्वर साह (25)

पण यात ठेकेदार, सुपरवायझर तसेच तेथील सुरक्षा रक्षकावर कारवाई करा, अशी मागणी त्याचे कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच अशाप्रकारच्या मारहाणीच्या घटना या येथे नेहमीच होतात, असाही आरोप त्यांनी केला आहे.

सैजाद यांच्या विरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात काही गुन्हे सुद्धा दाखल आहेत. पोलिसांनी मात्र कॅमेऱ्यासमोर याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. नेमका घटनेची कारण काय आहे? सैजाद हा चोरी करत असल्याने त्याला मारहाण करण्यात आली की काही दुसरा वैमनस्य होते, याची सखोल चौकशी सुरु आहे.  (Santacruz worker beaten Case)

संबंधित बातम्या : 

लग्नाच्या मंडपात आचाऱ्याची हत्या, पोलिसांकडून दोन आरोपीना अटक

‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्‍या वादळाची तयारी’, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.