Parali Murder : परळीत मुलीची छेड काढली म्हणून जाब विचारला, आईचा चाकूने भोकसून खून

काही दिवसांपूर्वी अनिता राठोड आणि त्यांचे पती तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना तांडा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे ठेवले होते. यावेळी बबन चव्हाण याने यातील एका मुलीची छेड काढली आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली.

Parali Murder : परळीत मुलीची छेड काढली म्हणून जाब विचारला, आईचा चाकूने भोकसून खून
परळीत महिलेची चाकूने भोसकून हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 11:59 PM

परळी : मुलीची छेड (Molestation) काढल्याबाबत जाब विचारायला गेलेल्या आईची चाकू भोसकून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना परळीत घडली आहे. अनिता राठोड असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. बबन चव्हाण आणि राजाभाऊ चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बबन चव्हाण याने अनिता राठोड यांच्या मुलीची छेड काढली होती. याचाच जाब विचारण्यासाठी अनिता बबनकडे गेल्या होत्या. यावेळी त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि भांडणाचं पर्यावसन हत्येत झालं.

जखमी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

काही दिवसांपूर्वी अनिता राठोड आणि त्यांचे पती तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना तांडा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे ठेवले होते. यावेळी बबन चव्हाण याने यातील एका मुलीची छेड काढली आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली. अनिता जेव्हा तिरुपतीहून परत आल्या तेव्हा मुलीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतापलेल्या अनिता राठोड बबनला छेडछाडीबद्दल जाब विचारण्यासाठी गेल्या. यावेळी अनिता आणि बबन यांच्यात जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की बबनने महिलेच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अनिता गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अनिता यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. आरोपीच्या अटकेसाठी रुग्णालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके रवाना करत बबन आणि त्याच्या वडिलांना अटक केले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. (Murder of a woman who went to inquire about the molestation of a girl in Parli)

हे सुद्धा वाचा

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.