भीमा नदीत धडावेगळे हातपाय आणि डोकं पाहून खळबळ, इंदापूर पोलिसांकडून 2 तासात आरोपींना अटक

इंदापूरमधील गणेशवाडी येथे एका 23 वर्षाच्या युवकाची त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या केली. पीडित तरुणाचा आरोपींच्या जवळच्या महिलांशी संबंध असल्याचा संशयावरुन बदल्याच्या भावनेने ही हत्या झाली.

भीमा नदीत धडावेगळे हातपाय आणि डोकं पाहून खळबळ, इंदापूर पोलिसांकडून 2 तासात आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 4:11 PM

पुणे : नात्यांचा प्रवास कसा होईल हे काही सांगता येत नाही. अनेकदा हा प्रवास विकोपाला जाऊन जीव घेण्याचे आणि देण्याचे प्रकारही घडतात. असाच एक धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडला. इंदापूरमधील गणेशवाडी येथे एका 23 वर्षाच्या युवकाची त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या केली. पीडित तरुणाचा आरोपींच्या जवळच्या महिलांशी संबंध असल्याचा संशयावरुन बदल्याच्या भावनेने ही हत्या झाली. आरोपींनी पीडित तरुणाचे दोन्ही हात आणि पायासह डोके धडावेगळे केले आणि भिमा नदीत फेकले होते. हा मृतदेह नदीत तरंगल्यानंतर झालेला खळबळजनक प्रकार उघड झाला (Murder of Friend due to suspicious about immoral relation in Indapur Pune).

संजय महादेव गोरवे (23 वर्षे) असं निर्घृण हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. संजयच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अवघ्या 2 तासांमध्ये आरोपींना अटक केलीय. बावडा गावातील दादा कांबळे, लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यंकटेश भोसले आणि महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.

मृत संजय लकी विकी आणि महेश हे चांगले मित्र होते. त्यामुळे या तिघांचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. यातूनच संजयची लकी, विकी आणि महेशच्या महिला नातेवाईकांशी ओळख झाली. पुढे ही ओळख वाढली आणि त्यातूनच संबंधित महिला संजयला घरच्या कामासाठी बोलावू लागल्या. ते एकत्र फिरुही लागले. मात्र, हीच गोष्ट लकी, विकी आणि महेशला सहन झाली नाही आणि त्यांनी संजयचा काटा काढण्याचा कट रचला.

दोन्ही हात, पाय आणि डोकं धडापासून वेगळं करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

या कटानुसार आरोपी लकी, विकी आणि महेशने संजयला त्यांच्या बावडा येथील काका दादा कांबळे यांच्या घरी कार्यक्रमाचं खोटं आमंत्रण दिलं. या ठिकाणी आल्यानंतर आरोपींनी संजयला भीमा नदीच्या गारअकोले पुलाजवळ नेऊन त्यांची धारदार शस्त्रांनी हत्या केली. आरोपींनी संजयचे दोन्ही हात, पाय आणि डोकंही धडापासून वेगळं केलं आणि कुणाला याची माहिती होऊ नये म्हणून नदीत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पाण्यात फेकलेला मृतदेह आणि शरीराचे इतर अवयव पाण्यावर तरंगले. यामुळे हा हत्याचा प्रकार समोर आला. संजयची आई तो बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेतच होती. त्यातच हा अनोळखी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी संजयच्या आईला बोलावले. यावेळी संजयच्या शरीरावरील जन्मजात खुणा आणि कपडे यावरुन आईने हा संजयचाच मृतदेह असल्याचं सांगितलं.

संजयची ओळख पटल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवत अवघ्या 2 तासाता आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करत आहेत.

हेही वाचा :

पुणे हादरलं! भीमा नदीपात्रात आढळला मृतदेह; डोके, हात-पाय शरीरापासून केले होते वेगळे

नागपूर शहर ड्रग्ज तस्करीचा नवा अड्डा?, नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

Murder of Friend due to suspicious about immoral relation in Indapur Pune

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.