शेतात पाणी भरत होती… एकटी पाहून त्यानं तिला लुटलं, नंतर जे घडलं ते भयानक होतं, बिचकुले प्रकरण आहे तरी काय?
मालेगाव तालुक्यातील दहिदी गावतील सुमनबाई बिचकुले या विवाहित महिलेच्या खुनाची घटना समोर आली आहे. मात्र, खुनाच्या घटनेच्याबाबत पोलीस तपासात आलेल्या माहितीवरुन खळबळ उडाली आहे.
नाशिक : चोर चोरी करण्यासाठी कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नसतो. अशीच एक घटना नाशिकच्या ग्रामीण ( Nashik Police ) भागात घडली आहे. मालेगाव तालुक्यातील ( Malegaon Crime ) दहिदी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. कांद्याच्या ( Onion ) शेतात पाणी भरणाऱ्या महिलेची एकाने लूट केली होती. लूट करतांना संशयित आरोपीने महिलेला मारहाण केली होती, महिलेच्या अंगावरील सोने घेऊन पळ काढण्यापूर्वी लुटीची घटना उघडकीस येऊ नये याकरिता किरण ओमकार गोलाईत याने सुमनबाई भास्कर बिचकुले यांची थेट हल्लाच केल्याचे उघड झाले आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी अवघ्या तीन दिवसांत ही घटना उघडकीस आली आहे. खरंतर सुमनबाई बिचकुले या महिलेचे फावड्याने पाय तोडून एका जंगल परिसरात पालापाचोळयाने झाकून टाकले होते.
सुमनबाई बिचकुले या विवाहित महिलेचा खून झाल्याची माहिती पंचक्रोशीत पसरल्याने खळबळ उडाली होती. महिला शेतात कांद्याचा पिकाला पाणी भरण्यासाठी गेली असतांना ही घटना घडली आहे.
आर्थिक विवंचनेत असलेल्या सेंट्रींग कारागिर किरण गोलाईत हा सुमनबाई जिथं शेतात पाणी भरत होत्या तिथून जात होता, त्यावेळी त्यांच्या अंगावरील सोनं, पायात असलेली चांदीचे कडे पाहून लूट केली आहे.
सुमनबाई बिचकुले यांच्या हातात पाणी भरण्यासाठी असलेले फावडे घेऊनचं किरण गोलाईत याने हल्ला केला आहे. यामध्ये सुमनबाई यांच्या डोक्यात फावडे मारले होते, पायही तोडले होते.
सुमनबाई यांचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याने शेताच्या बाजूलाच काही अंतरावर झाडं आहे त्याठिकाणी पालापाचोळा आणि मातीच्या सहाय्याने मृतदेह पुरून ठेवला होता.
सुमनबाई या घरी आल्या नाही म्हणून शोध सुरू झाला होता, त्यानंतर ग्रामीण पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मालेगाव शहरात पोलीसांनी तपास सुरू केला होता.
सराफाच्या दुकानात महिलेच्या अंगावरील सोनं घेऊन संशयित किरण गोलाईत आला होता, त्यानुसार सराफाच्या मदतीने पोलीसांनी किरण गोलाईत याला अटक केली आहे.
महिलेचे पाय तोडण्यामागील हेतु दागिने लुटण्याचा होता. त्यामुळे सराफ दुकानदार यांच्या मदतीने पोलिसांना खुनाच्या घटनेची उकल करता आली आहे. मात्र, परिसरात या खुनाच्या घटणेने खळबळ उडाली आहे.