दोन वर्षांपासून त्याच्या हत्येचा कट शिजत होता पण त्याला समजलंच नाही, सूर्याचा जीव का गेला ?
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तो इंस्टाग्रामवर एका महिलेला भेटला आणि प्रेमात पडला. त्यानतंर तो त्याच्या त्नी, मुलांना सोडून त्या महिलेसोबतच राहू लागला. पण अचानक त्याचा मृतदेहच सापडला. पोलिसांना त्या महिलेवरच संशय आला, पण जे खरं समोर आले ते ऐकून...

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली, जो पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. त्याला दोन मुलेही आहेत, मात्र नवऱ्याचे सऱ्या महिलेवर प्रेम असल्याचं समजताच त्याची पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली. तेव्हापासून तो दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. पण तेव्हाच कहाणीत ट्विस्ट आला, त्या इसमाचीच निर्घृण हत्या झाली. आणि तेव्हापासूनच त्याच्यासोबत राहणारी महिलाही फरार झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्यावरच संशय आला. म्हैसूर तालुक्यातील अनुगनहल्ली येथून हे प्रकरण उघडकीस आले असून म्हैसूर येथील दोरेस्वामी उर्फ सूर्या यांची हत्या करण्यात आली आहे. तो विवाहित होता, परंतु तो इन्स्टाग्रामवर भेटलेल्या एका महिलेसोबत राहत होता. सूर्या याचा हिंकळ येथील रहिवासी असलेल्या दीपिकासोबत सात वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. दोघांचेही आयुष्य सुखात चालले होते. पण त्यांच्या सुखी संसाराला जणू काही नजरच लागली. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर सूर्याची भेट बंगळुरूमध्ये राहणाऱ्या श्वेताशी झाली आणि सगळंच बदललं. आणि त्यातच आणखी एक ट्विस्ट आला. 12 मार्चच्या रात्री सूर्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
काही दिवसांतच झाली हत्या
इंस्टाग्रामवर भेटल्यानंतर श्वेता आणि सूर्या एकत्र राहू लागले. आपला नवरा दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडल्याचे समजताच त्याची पत्नी भडकली आणि मुलांसह घर सोडून माहेरी गेली. एवढंच नव्हे तर सूर्याची आईदेखील सुनेसोबत गेली होती पण इतकं होऊनही सूर्या श्वेतासोबतच राहत होता. सूर्याच्या पत्नीने सांगितले की, सूर्या तिला अनुगनहल्लीतील त्यांची दोन एकर जमीन, घर आणि मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगत होता. पण त्याच्या बायकोने याला नकार दिला. आणि त्यानंतरच अवघ्या काही दिवसांनी 12 मार्चच्या रात्री सूर्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
श्वेतावर हत्येचा आरोप
सुरुवातीला सूर्याच्या कुटुंबीयांनी श्वेतावर सूर्याच्या हत्येचा आरोप केला होता. कारण हत्येच्या दिवशी गावकऱ्यांनी सूर्याला श्वेतासोबत घरी पाहिले होते. त्यानंतर 13 मार्चला सकाळी ती एका बस स्टॉपजवळून जाताना दिसली.एवढेच नाही तर दारूच्या नशेत सूर्याने एक मेसेजही केला होता, श्वेता काही दिवसांपासून आपल्याला धोका देत असल्याचे सूर्याने त्यामध्ये म्हटलं होते. या सर्व प्रकारामुळे श्वेताने मालमत्तेच्या कारणावरून सूर्याचा खून केल्याचा असा संशय व्यक्त करत त्याच्या घरच्यांनी तिच्याव हत्येचा आरोप लावला. कुटुंबीयांनी श्वेताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता संपूर्ण प्रकरण उलटले.
पोलिसांनी श्वेताचा शोध घेतला, मात्र श्वेताचा मोबाईल बंद होता आणि तिचा अद्याप पत्ता लागला नाही. श्वेतानेच खून केल्याचा संशय पोलिसांना होता. पण पोलिसांनी अधिक तपास केला असता तेव्हा वेगळीच गोष्ट समोर आली. तपासादरम्यान सूर्याचे इतर कोणाशी वैर होते का, याची माहिती मिळाली. शरद नावाच्या माणसाशी त्याचा वाद झाल्याचंही समोर आलं.
दोन वर्षांपासून खुनाचे प्लानिंग
शरद आणि सूर्या हे दोन मित्र होते. दारूच्या नशेत दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती समोरआलवी. वादानंतर सूर्याने शरदच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, शरदची टोळी गेल्या दोन वर्षांपासून सूर्याला मारण्याचा कट रचत असल्याचे निष्पन्न झाले. शरद दुसऱ्या एका प्रकरणातही तुरुंगात शिक्षा भोगत होता. तुरुंगात जाताना त्याने आपल्या टोळीतल्या माणसांना सूर्याबद्दल सांगितले, त्यानंतरच सूर्याची हत्या झाली.
अशी झाली हत्या
त्यानंतर शरदच्या टोळीतील लोकांनी 12 मार्च रोजी सकाळी ड्रग्ज खरेदी केले होते. त्याच रात्री शरदचे मित्र राजू, किरण, मनू, चंदू, शेखर उर्फ मुंगू, सुनील कुमार आणि दोन अल्पवयीन मुलं ही अनुगनहळ्ळी येथील सूर्याच्या घरात घुसले. तेव्हा तो आणि श्वेता दोघेही नशेत होते. तेव्हा या लोकांनी सूर्याच्या डोक्यावर व पोटावर बंदुकीने वार करून खून केला. त्यांनी श्वेतालाही पकडलं, पण आपण त्याची पत्नी नाही, मी फक्त घरी येत -जात असते,असं श्वेताने आरोपींना सांगितलं. हत्येनंतर मारकऱ्यांनी तिला मैसूरच्या बोगाडी जवळ सोडून दिलं तेथून ती फरार झाली.
पण श्वेताने हत्या केलीच नाही , तिचा हत्येत काही सहभाग नव्हता तर ती पळून का गेली याचा पोलीस सध्या तपास घेत आहेत. श्वेताचा अनेक ठिकाणी पोलिस शोध घेत असून तिला अटक झाल्यानंतर मगच या प्रश्नांची उत्तर मिळतील.