Nagpur : खड्डा चुकवण्याच्या नादात नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक; चार जण जागीच ठार
अपघातामूळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.
नागपूर – नागपूर (Nagpur )-औरंगाबाद (Aurangabad) महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्याजवळ ही घटना घडली आहे. दोन्ही ट्रक मधील चार जणांचा घटनास्थळी जागीचं मृत्यू झाला आहे. महामार्गावरील खड्डा वाचवताना भीषण अपघात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामूळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. सलाखी घेऊन जाणारा ट्रक (Truck) दुसऱ्या ट्रकवर आदळला आहे. सलाखी दोन जणांच्या अंगातून आरपार गेली आहे. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
20 किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर खड्डा वाचवताना दोन ट्रक समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन्ही ट्रक मधील चार जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आता पर्यत वाहनांच्या 20 किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू केला सध्या वाहतूक सुरळी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र महामार्गावरील खड्डयांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून हे खुड्डे केव्हा बुजवणार व महामार्गावरील खड्डे आणखी किती प्रवाश्यांचा जीव घेणार असा संतप्त सवाल प्रवाशी विचारत आहे.
खड्डा वाचवत असताना अपघात
भीषण अपघात झाला आहे. रस्त्यामध्ये आलेला खड्डा वाचवत असताना हा अपघात झाला आहे. त्यामुळे ट्रकमधील चारही नागरिक जागीच ठार झाले आहेत. दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रॅफिक हटवण्याचं काम सुरु आहे.
मृतदेह तिथल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत
सध्या तिथल्या परिसरात मोठी वाहनांची रांग लागली आहे. अनेक मोठी वाहने रखडली आहेत. दोन ट्रक बाजूला घेतल्याशिवाय तिथला रस्ता मोकळा केला जाणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह तिथल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून माहिती दिली आहे. तसेच शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.