Car Accident : दोन शिकावू डॉक्टरांच्या कारची रेस, एक कार पलटी मारुन भिंतीवर आदळली, तर दुसरी कार पलटी मारुन…
दोन शिकावू डॉक्टरांच्या रेसमध्ये नागपूरातील पडोळे चौकापुर्वी रिंग रोडवर रविवारी मध्यरात्री दोन कार पलटल्या. हा अपघात इतका जोरदार होता की एक कार पलटी मारून एका घराच्या भिंतीवर जाऊन पडली
नागपूर – काल रात्री दोन शिकावू डॉक्टरांची रेस (Doctor car race) त्यांच्या अंगलट आली, भरधाव वेगाने निघालेल्या दोन्ही कार एकमेकींना घासल्या, त्यानंतर हवेत उडाल्या. हा थरार अपघात (Car accident) पाहणाऱ्या लोकांनी अक्षरश: डोळे बंद केले. हा अपघात इतका भयानक होती, की एक हवेत उडून घराच्या भींतीवर आदळली. तर एक कार रस्त्यात उडून पडली. या अपघाताची सगळीकडे चर्चा आहे. दोन्ही डॉक्टरांना गंभीर जखमा झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी (nagpur police) दोन्ही कार चालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी करीत आहेत.
नेमकं काय झालं
दोन शिकावू डॉक्टरांच्या रेसमध्ये नागपूरातील पडोळे चौकापुर्वी रिंग रोडवर रविवारी मध्यरात्री दोन कार पलटल्या. हा अपघात इतका जोरदार होता की एक कार पलटी मारून एका घराच्या भिंतीवर जाऊन पडली, तर दुसरे कार रस्त्यावर आदळल्याने कारचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात डॉक्टरांना गंभीर जखमा झाला नाहीत.
वरून आणि अभिनव अशी शिकावू डॉक्टरांची नावे आहेत. हिंगणातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. रात्री उशिरा बाहेरून जेवण करून प्रताप नगर चौकातून संभाजीनगर चौकाकडे चालले होते. त्यावेळी दोन्ही कार वेगाने होत्या, दोन्ही कार एकमेकांना घासल्या गेल्या. त्यानंतर दोन्ही गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रताप नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी तिथं ग्रामस्थांनी अधिक गर्दी केली होती. प्रताप नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.