गर्लफ्रेंडवर उधळपट्टी करण्यासाठी मोबाईल चोरी… एक चूक झाली अन् गर्लफ्रेंडमुळेच तिघे जाळ्यात; काय घडलं असं?

गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी नागपूरच्या काही तरूणांनी हद्दच केली. पैसे मिळावेत म्हणून त्यांनी चक्क मोबाईल स्नॅचिंगचा धंदाच सुरू केला. तिघा मित्रांनी मिळून गँग बनवली आणि लोकांचे मोबाईल लुटू लागले

गर्लफ्रेंडवर उधळपट्टी करण्यासाठी मोबाईल चोरी... एक चूक झाली अन् गर्लफ्रेंडमुळेच तिघे जाळ्यात; काय घडलं असं?
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 12:25 PM

तरूण वयात मुला-मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक असतं. त्यातच गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल तर त्यांच्यासोबत वेळ घालवायची, त्यांना गिफ्ट्स देण्याची इच्छाही असते. पण गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी नागपूरच्या काही तरूणांनी हद्दच केली. पैसे मिळावेत म्हणून त्यांनी चक्क मोबाईल स्नॅचिंगचा धंदाच सुरू केला. तिघा मित्रांनी मिळून गँग बनवली आणि लोकांचे मोबाईल लुटू लागले. पण ज्या गर्लफ्रेंडसाठी ते हे सर्व करत होते, तिच्यामुळेच ते अडकले आणि पकडले गेले. आता ते पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून 15 मोबाईल हस्तगत करण्यात आले. आरोपी हे या क्षेत्रात नवीन असून गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा पोलीस तपासात उघड झालं. पोलिसही त्यांचा हा कारनामा ऐकून हैराण झाले.

नागपूरच्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून तीन मित्रांनी एकत्रित येत एक गँग बनवली आणि ही मोबाईल स्नॅचिंग करू लागली. हे तिघेही संध्याकाळच्या वेळेस दुचाकी वरून निघायचे आणि सुनसान परिसर गाठायचे. तिथे एखादी व्यक्ती जर मोबाईलवर बोलत असेल तर अलगद त्याच्या जवळून गाडी न्यायचे आणि त्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढायचे. असं करत करत त्यांनी मोबाईल चोरीचा एक प्रकारे व्यवसायच सुरू केला होता.

कसे सापडले ?

मात्र एका चुकीमुळे ते पोलिसांच्या हाती लागले. खरंतर त्यांनी चोरी केलेल्या मोबाईल्सपैकी एक मोबाईल हा तिघांपैकी एकाच्या गर्लफ्रेंडजवळ आढळला. पोलिसांनी तिच्याकडे सविस्तर चौकशी केल्यावर चोरीच्या गँगचं हे सगळं प्रकरण उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांही आरोपींना अटक करून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 मोबाील फोन हस्तगत केले आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून यामध्ये आणखी एखादा आरोपी वाढण्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.