Nagpur Crime : अज्ञाताने पार्किंगमधील मोटारसायकल जाळल्या! घटना CCTV मध्ये कैद, आरोपीचा शोध सुरु
25 एप्रिल रोजी एका घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 दुचाकी अज्ञाताने जाळल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, जरीपटका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नागपूर : नागपुरातील गुन्हे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. नागपुरात गुन्हेगारीच्या (Nagpur Crime) प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी जरीपटका भागात अजून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 25 एप्रिल रोजी एका घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 दुचाकी अज्ञाताने जाळल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद (CCTV Video) झालीय. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, जरीपटका पोलीस (JariPatka Police) आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी जाळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
नागपूरच्या जरीपटका भागातील एका घराच्या पार्किंगमध्ये एक्टिव्हा कंपनीच्या दुचाकी उभ्या असलेल्या या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. काही वेळाने तिथे एक तरुण तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधून येतो. तो गाड्यांवर कुठलातरी ज्वलनशील पदार्थ टाकतो. त्यानंतर काडीपेटीने तो गाड्यांना आग लावतो. तेव्हा आगीचा भडका झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. गाड्या पेटवून दिल्यानंतर तो तरुण तिथून पळ काढतानाही या व्हिडीओत दिसून येत आहे. साधारण 25 सेकंदांच्या या व्हिडीओत संपूर्ण घटना पाहायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओत आरोपीने आपला चेहरा झाकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोपीला अटक करण्याचं आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे.
अज्ञात आरोपीचा शोध सुरु
25 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वसंतशाह चौक जरीपटका परिसरातील दर्शनलाल किंगराणी यांच्या पार्किंगमधील चार अॅक्टिव्हा मोटारसायकल अंदाजे 20 ते 22 वर्षाच्या आरोपीने आग लावून नुकसान केल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीविरोधात भादंवी 427 आणि 435 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. जरीपटका पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.
Video : नागपूरच्या जरीपटका परिसरात अज्ञाताने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी जाळल्या! संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद@NagpurPolice @Dwalsepatil #Nagpur #NagpurCrime #cctvfootage #NagpurPolice pic.twitter.com/r7Hd1UTJpx
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2022
इतर बातम्या :