पत्नीशी पटेना, नवऱ्याने फेसबुकवर तिचाच अश्लील व्हिडीओ टाकला

पत्नीच्या बदनामीसाठी आरोपी सुरेश स्वतःच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असे (Husband Shares Vulgar Videos of Wife)

पत्नीशी पटेना, नवऱ्याने फेसबुकवर तिचाच अश्लील व्हिडीओ टाकला
नागपुरात पतीनेच पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केले
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 7:17 AM

नागपूर : पत्नीशी पटत नसल्यामुळे तिच्या बदनामीसाठी नवऱ्याने अत्यंत घृणास्पद प्रकार केला. फेसबुकवरुन पतीने स्वतःच्या पत्नीचेच अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपुरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पतीच्या विरोधात नागपुरातील यशोधानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nagpur Crime Husband Shares Vulgar Photo Videos of Wife on Social Media)

राजस्थानचा नवरा, पत्नी नागपूरची

पती-पत्नीचं नातं हे विश्वासाचं असतं. पण जेव्हा नात्यांमधूनच विश्वास उडून जातो, तेव्हा हे नातं नाममात्र राहतं आणि घात करतं. असाच प्रकार घडला उपराजधानी नागपुरात. 37 वर्षीय सुरेश लक्ष्मीचंद सुमन हा राजस्थानमधील कोटा शहरात राहतो. सुरेशचे आपल्या पत्नीसोबतचे संबंध बिघडले होते. त्यामुळे त्याची 25 वर्षीय पत्नी नागपुरात राहायला आली.

बनावट फेसबुक आयडीवर पत्नीचे व्हिडीओ

दरम्यान, आरोपीने 17 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत एक बनावट फेसबुक आयडी तयार केला. त्यावरुन सुरेश स्वतःच्याच पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असे. सोबत त्याने पत्नीच्या मित्रमैत्रिणींचे फोटोही टाकले.

आरोपी पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा

काही दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार पत्नीच्या लक्षात आला. त्यानंतर तिने शनिवारी नागपुरातील यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित पत्नीने पती सुरेश सुमन याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली पती सुरेश सुमनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पत्नीशी पटत नसल्यामुळे तिच्या बदनामीसाठी सुरेशने हे कृत्य केल्याचं समोर आलं. या प्रकरणी यशोधरानगर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Husband Shares Vulgar Videos of Wife)

नागपुरात अश्लील व्हिडीओ प्रकरणाची पुनरावृत्ती 

नागपुरात डिसेंबर 2018 मध्येही असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला होता. पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून पीडितेने आपल्या माहेरी जाण्याची गोष्ट केली होती. परंतु, पतीने नकार दिला. काही दिवसांनी जेव्हा पती कामानिमित्त नागपूरला गेला, तेव्हा पत्नीने पळ काढून माहेर गाठलं. पण पत्नी माहेरी गेल्याची बाब आरोपी पतीला खटकली आणि त्याने पत्नीची बदनामी करत तिचा अश्लील व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर पतीला बेड्या ठोकण्याक आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

परदेशी तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुंबईत अभिनेत्याला अटक

माहेरला गेलेली पत्नी परत येईना, नवऱ्याने ‘पर्सनल’ व्हिडीओ फेसबुकवर टाकला!

(Husband Shares Vulgar Videos of Wife)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.