घरातील परिस्थिती हालाखीची असल्यामुळे बीएससीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने पोलिसांना फोडला घाम
NAGPUR CRIME NEWS : पैशाच्या हव्यासापोटी हा सुशिक्षित युवक चोर बनला, मात्र आता तो पोलिसांच्या हाती लागल्याने त्याला जेल ची हवा खावी लागणार आहे.
नागपूर : घरातील परिस्थिती हालाखीची असल्यानं लवकर पैसे मिळवण्यासाठी बीएससी पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने (young) बाईक चोरी (bike theft) करायला सुरुवात केली. सय्यद गुफरान सय्यद निजाम असं त्या तरुणाचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 8 दुचाकी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा सुशिक्षित युवक चोर बनला, मात्र आता तो पोलिसांच्या (nagpur police) हाती लागल्याने त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. त्याला श्रीमंत व्हायचं असल्यामुळे त्याने वेगवेगळ्या मार्गाचा उपयोग केला. परंतु बाईक चोरण्याचा धंदा त्याला योग्य वाटल्यामुळे आतापर्यंत आठ बाईक चोरल्या असल्याची कबुली सुद्धा दिली आहे.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला श्रीमंत व्हायचं होत
त्याला चांगलं शिक्षण घेऊन मोठं व्हायचं होत, म्हणून त्याने बीएससी पर्यंत शिक्षण केलं. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला श्रीमंत व्हायचं होत. लवकर पैसे मिळवायचे होते, म्हणून त्याने वेगळाच मार्ग अवलंबला आणि तो बाईक चोर झाला. तहसील पोलिसांनी दुचाकीच्या चोरी प्रकरणात ओळख पटवत गुफरानला अटक केली. तो वर्दळीच्या ठिकाणी स्वत: ची बाईक पार्क करून दुसरी दुचाकी चोरून नेत होता. त्यानंतर नंबर प्लेट बदलत विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. यापूर्वी त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता. पण त्याने 8 दुचाकीच्या चोरल्याच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती विनायक गोल्ले, पोलीस निरीक्षक, तहसील नागपूर यांनी सांगितलं
पैशाच्या हव्यासापोटी हा सुशिक्षित युवक चोर बनला, मात्र आता तो पोलिसांच्या हाती लागल्याने त्याला जेल ची हवा खावी लागणार आहे.