Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : लिव्ह-इनमध्ये प्रेयसीवर अत्याचार, मृत आईच्या नावाने कर्ज काढून घातला गंडा; अखेर..

लग्नाचं आमिष दाखवून आधी प्रेयसीला लिव्ह-इनमध्ये राहण्यास भाग पाडलं. मात्र नंतर त्या भाट्याने तिच्या मृत आईच्या नावाचाही गैरवापर केला. याप्रकरणी तरूणीच्या तक्रारीनंतर पाचपावली पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली.

Nagpur Crime : लिव्ह-इनमध्ये प्रेयसीवर अत्याचार, मृत आईच्या नावाने कर्ज काढून घातला गंडा; अखेर..
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 2:57 PM

सुनील ढगे,टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 8 नोव्हेंबर 2023 : प्रेमात माणूस सगळं काही विसरतो असं म्हणतात, पण काही जण तर प्रेमात इतक आंधळे होतात की चांगल्या-वाईटाची समजही हरवून बसतात. पण त्यामुळे नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. प्रेमात पडलेल्या अशाच एका तरूणीला असा मोठा फटका बसला की त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

लग्न करण्याचं आमिष दाखवून लिव्ह-इनमध्ये राहण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकरावर विश्वास ठेवणं तिला खूप महागात पडलं. त्याने प्रेयसीवर लैंगिक अत्याचार तर केलेच पण तिच्या मृत आईच्या नावाचा गैरवापर काढून मोठ्या रकमेचं कर्जही काढलं. तिला धोका दिला. मात्र हे उघड होताच, ती तरूणी फक्त अश्रू गाळत बसली नाही तर तिने थेट त्या भामट्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. अखेप पाचपावली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. प्रफुल बले असे आरोपीचे नाव आहे.

सहारा देण्याच्या बहाण्यान साधली जवळीक

फिर्यादी युवतीची मृत आई आणि आरोपी प्रफुल बले यांची एकमेकांशी ओळख होती. मात्र त्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तिची मुलगी एकटी पडली. हीच संधी साधून आरोपी प्रफुल याने सहारा देण्याच्या, मदत करण्याच्या बहाण्याने त्या तरूणीशी जवळीक साधली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि लग्नाचं आश्वासनही दिलं. ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र त्यानंतर त्याचा खरा चेहरा उघडकीस आला. आरोपी प्रफुल याने त्या तरूणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

असा उघडकीस आला गुन्हा

पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्या तरूणीला फसवून तिच्या मृत आईचं आधार कार्ड आणि इतर कागदपत्रं मिळवली आणि त्यांच्या सहाय्यानेच त्याने मोठ्या रकमेचं कर्जही काढलं. बराच काळ होऊनही कर्जाचे हफ्ते भरण्यात न आल्याने अखेर बँकेचे कर्मचारी घरी आले आणि त्या तरूणीकडे कर्जाची परतफेड करण्याबद्दल विचारणा केली. पण आपल्या आईचा तर मृत्यू झाला आहे, मग तिने कर्ज कसं काढलं असेल असा प्रश्न तरूणीने उपस्थित केला. तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी तिच्यासमोर सर्व पुरावे सादर करत परिस्थिती सांगितली. आरोपीने आपल्याला फसवलं एवढंच नव्हे तर आईच्या नावाचा गैरवापर करून कर्जही घेतलं. हे समजल्यानंतर त्या तरूणीचा राग अनावर झाला.

संतापलेल्या तरूणीने तातडीने पाचपावली पोलिस स्टेनश गाठून आरोपी प्रफुल याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. आणि आरोपी प्रफुल बने याला बेड्या ठोकून अटक केली. युवतीच्या वाईट परिस्थितीचा गैरफायदा घेत या आरोपीने केलेलं कृत्य अतिशय निंदनीय असून आता त्याल त्याच्या कृत्याची फळ भोगावे लागणार आहे. पोलिस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....