ऑनलाईन गेमिंगचा लावला नाद, 58 कोटी गेल्यानंतर व्यापाऱ्याला आली जाग

अनंत जैन याने तक्रारदार यांना ऑनलाईन लिंकवर बेटिंग करण्याची सवय लावली. तक्रारदार हे त्यांचे पैसे रिकव्हर करण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून उधार पैसे घेतले.

ऑनलाईन गेमिंगचा लावला नाद, 58 कोटी गेल्यानंतर व्यापाऱ्याला आली जाग
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 11:20 PM

नागपूर : ऑनलाइन गेमच्या नादात अडकून एका व्यापाऱ्याने तब्बल 58 कोटी रुपये गमावले. ही धक्कादायक घटना नागपुरात घडली. तक्रारदार नागपूर शहरातील मोठे व्यापारी आहेत. 58 कोटी रुपये गमावल्यानंतर त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर गोंदियातील आरोपीच्या घरी धाड टाकली. आरोपीच्या घरातून पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे 4 किलो सोनं आणि 10 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. मात्र, आरोपी पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पैसे कमवण्याचे आमिष

या प्रकरणातील तकारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार, अनंत उर्फ सोन्दू नवरतन जैन याने ऑनलाईन गेमिंग अॅपवर 24 तास बेटिंग करून करोडो रुपये कमावता येतील असे प्रलोभन दिले. तक्रारदार यांना कमी कालावधीत फार जास्त पैसे कमावण्याचे लालच दिले. आरोपीने त्यांना ऑनलाईन बेटींग/गेमिंग लिंकचे युझरनेम, पासवर्ड पाठवले. त्यावर दिलेले पॉईंट परत होणार नाहीत, असे बोलून बेटिंग करण्यासाठी बाध्य केले.

४० लाखांची मागितली खंडणी

अनंत जैन याने तक्रारदार यांना ऑनलाईन लिंकवर बेटिंग करण्याची सवय लावली. तक्रारदार हे त्यांचे पैसे रिकव्हर करण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून उधार पैसे घेतले. आरोपीच्या सांगण्यावरून बेटिंग करीत होते. परंतु, तक्रारदाराला कधीही फायदा झाला नाही. ऑनलाईन बेटिंगमध्ये फक्त आरोपीलाच फायदा होत होता. तक्रारदार यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर फिर्यादीने आतापर्यंत गमावलेले पैसे आरोपीकडे परत मागितले. तेव्हा आरोपीने तक्रारदार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. उलट 40 लाख रुपयांची खंडणी मागितली.

५८ कोटी रुपयांची फसवणूक

अखेर सर्व पर्याय संपल्यानंतर फिर्यादीने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. आरापींनी लिंकमध्ये सेटिंग आणि मॅन्युपुलेशन करून फिर्यादीला बनावट ऑनलाईन लिंकमध्ये खेळण्यास भाग पाडले. तब्बल 58 कोटी 42 लाख 16 हजार 300 रुपयांनी फसवणूक केली आहे. फिर्यादीजवळील सर्व बचत गेमच्या नादात गमावली आहे. एवढंच नाही तर मित्र आणि नातेवाईकांकडूनही कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. फिर्यादीचे आरोपींविरूध्द दिलेल्या रिपोर्टवरून सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.