Nagpur Youth Suicide : नागपूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, बेरोजगारीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

पवन ठाकरे हा उमरेड शहरातील लक्ष्मी नगर 2 भागात आपल्या कुटुंबासह राहत असून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र उच्च शिक्षण घेऊनही पवन बेरोजगार होता. त्याला मनाप्रमाणे नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नौराश्येत होता. याच कारणातून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

Nagpur Youth Suicide : नागपूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, बेरोजगारीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
नागपूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 4:43 PM

नागपूर : बेरोजगारीला कंटाळून एका 25 वर्षाच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात घडली आहे. पवन नरेंद्र ठाकरे असे मयत तरुणाचे नाव आहे. उच्चशिक्षित असून बेरोजगार (Unemployed) असल्याने नैराश्येतून पवने आपली जीवनयात्रा संपवली. उमरेड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उमरेड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पुढील तपास उमरेड पोलिस करीत आहेत. (A highly educated unemployed youth committed suicide by hanging himself in Nagpur)

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊनही बेरोजगार होता

पवन ठाकरे हा उमरेड शहरातील लक्ष्मी नगर 2 भागात आपल्या कुटुंबासह राहत असून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र उच्च शिक्षण घेऊनही पवन बेरोजगार होता. त्याला मनाप्रमाणे नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नौराश्येत होता. याच कारणातून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पवन रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असल्याने सकाळी उशिरा उठायचा. परंतु दुपारी 12 वाजून गेले तरी तो उठला नाही. या कारणाने घरच्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिउत्तर न आल्याने दार तोडून आत पाहिलं असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लागलीच उमरेड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. उमरेड पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन पाठवला. पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे. (A highly educated unemployed youth committed suicide by hanging himself in Nagpur)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.