Nagpur Murder : जुन्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या, आरोपीने मृतदेहाचा फोटो काढून मित्राला पाठवला

शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावरुन मयत नारायण द्विवेदी हा दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाला होता. यावेळी अज्ञात आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

Nagpur Murder : जुन्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या, आरोपीने मृतदेहाचा फोटो काढून मित्राला पाठवला
नागपुरमधील हत्या प्रकरणाचा धक्कादायक खुलासाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 10:31 PM

नागपूर : नागपुरात गुन्हेगारी थांबवण्याचे नावच घेताना दिसत नाही. रविवारी आणखी एका तरुणाच्या हत्येची घटना घडली आहे. जुन्या वादातून नागपूर शहरातील काटोल रस्त्यावर एका तरुणा (Youth)ची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Murder) करण्यात आली आहे. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशन (Gittikhadan Police Station) आणि गुन्हेशाखा कार्यालयापासून काही अंतरावरच नारायण गयाप्रसाद द्विवेदी नावाच्या इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाचा फोटो काढून मित्राला पाठवला

शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावरुन मयत नारायण द्विवेदी हा दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाला होता. यावेळी अज्ञात आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नारायण द्विवेदी याच्यावर अनेक वार केल्याने तो दुचाकीसह रस्त्यावरच कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी याची हत्या केल्यानंतर मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढून तो मित्राला पाठवला. त्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नारायण द्विवेदी हा सुरेंद्रगड वस्तीत भाड्याने राहत होते. दरम्यान, आरोपींनी नेमकी कोणत्या कारणावरुन नारायणची हत्या केली याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच फरार आरोपींचाही शोध घेत आहेत. (A young man was killed by stabbing him with a sharp weapon due to an old dispute in Nagpur)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.