Nagpur Railway Accident : हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत होती, इतक्याच भरधाव ट्रेन आली अन्…

आज सकाळी टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फाटक ओलांडून जात होती. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत चालली होती.

Nagpur Railway Accident : हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत होती, इतक्याच भरधाव ट्रेन आली अन्...
भरधाव रेल्वेने तरुणीला चिरडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 5:55 PM

नागपूर : कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. कानात हेडफोन असल्याने ट्रेनचा आवाज तरुणीला ऐकू आला नाही. यामुळे तरुणी रेल्वेखाली चिरडली गेल्याची घटना नागपूरमध्ये घडली. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव असे मयत तरुणीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मूळची भंडारा जिल्ह्यातील निवासी आहे तरुणी

मयत विद्यार्थिनी आरती गुरव ही मूळची भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे ती वास्तव्याला होती. आरती गुरव डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडत होती

आज सकाळी टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फाटक ओलांडून जात होती. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत चालली होती.

हे सुद्धा वाचा

याचदरम्यान त्या ट्रॅकवर भरधाव वेगात ट्रेन येत होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला मोठमोठ्याने आवाज दिला. मात्र हेडफोन कानात असल्याने तिला कुठलाही आवाज आला नाही.

ट्रेनने 50 फूट फरफरट नेले

भरधाव आलेल्या पुणे-नागपूर रेल्वेखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. इतकेच नाही रेल्वेने तिला 50 फूट पर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. हिंगणा पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.