दारू पिण्यावरून वाद झाला, तिघांनी युवकाला संपवले, नंतर माहीत झाली ही भयानक घटना

आतीशवर मारपीट, चोरीसारखे सहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आले होते. रविवारी रात्री तीन आरोपी शनिमंदिराजवळ बसून दारू पित होते.

दारू पिण्यावरून वाद झाला, तिघांनी युवकाला संपवले, नंतर माहीत झाली ही भयानक घटना
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 7:53 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : नागपुरात धक्कादायक घटना समोर आली. रविवारी रात्री एका युवकाचा तिघांसोबत वाद झाला. ते तीन जण दारू पित बसले होते. या वादाचा शेवट अतिशय वाईट झाला. कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत दत्तनगरात ही घटना घडली. तीन जणांनी मिळून दगडाने ठेचून युवकाची हत्या करण्यात आली. आतीश ठाकरे असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. मृतक हा ३० वर्षीय आहे. आतीश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.

आतीशवर सहा पेक्षा जास्त गुन्हे

आतीशवर मारपीट, चोरीसारखे सहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आले होते. रविवारी रात्री तीन आरोपी शनिमंदिराजवळ बसून दारू पित होते. आतीश तिथं गेला. त्यानंतर आतीशचा आसीफ अली नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला.

आतीशचा आसीफसोबत आधीचा वाद

आतीशचा आसीफसोबत आधीचा वाद होता. त्यानंतर आसीफसोबत असलेल्या तिघांनी आतीशची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सकाळी मंदिराजवळ आतीशचा मृतदेह पडलेला होता.

घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. मृतक आतीश ठाकरे निघाला. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपींचा शोध घेतला. गोपनीय माहितीच्या आधारे तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपसी वादातून हत्या

नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीत युवकाची हत्या करण्यात आली. दगडाने ठेचून तीन आरोपींनी ही हत्या केली. आतीश ठाकरे अस मृतकाचे नाव आहे. 2 ते 3 आरोपीने मिळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आपसी वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.