Nagpur Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जरीपटका पोलिसांकडून आरोपीला अटक
नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी अमितेश श्रीवास हे दोघे एकाच परिसरात राहतात. एकाच परिसरात राहत असल्याने दोघांची ओळख झाली. दोघांची रोज भेट व्हायची. सदर तरुणाने आधी पीडित 15 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीवर सलग दोन वर्षे लैंगिक अत्याचार केला.
नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून 27 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Arrest) केले आहे. अमितेश आशिष श्रीवास असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपीने पीडित मुलीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मग लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र नंतर लग्नासाठी नकार देत असल्याने मुलीने पोलिस ठाणे गाठत तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.
लग्नाविषयी विचारल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा
नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी अमितेश श्रीवास हे दोघे एकाच परिसरात राहतात. एकाच परिसरात राहत असल्याने दोघांची ओळख झाली. दोघांची रोज भेट व्हायची. सदर तरुणाने आधी पीडित 15 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीवर सलग दोन वर्षे लैंगिक अत्याचार केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी मुलीला टाळत होता. मुलीने आरोपीला लग्नाविषयी विचारले असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. अखेर मुलीने जरीपटका पोलिस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षांचा सश्रम कारावास
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला. अजय दीपक बावणे असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला कलम 7 व 8 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड 2000 रुपये, दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.