Nagpur Crime : हायप्रोफाईल तरुणांची पहाटे शहरात हुल्लडबाजी, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

| Updated on: Jan 18, 2023 | 3:48 PM

अंबाझरी पोलिसांनी या रीलच्या माध्यमातून आरोपी तरुणांना शोधून त्यांची वाहन जप्त केली आहेत. याप्रकरणी 13 तरुणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 3 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Nagpur Crime : हायप्रोफाईल तरुणांची पहाटे शहरात हुल्लडबाजी, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली ही कारवाई
क्षुल्लक कारणातून तरुणीची दुकानदाराला मारहाण
Follow us on

नागपूर : उच्चभ्रू घरातील मस्तवाल तरुणांनी पहाटे कारमधून शहरात हुल्लडबाजी केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणांचा हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत पोहचला आणि पोलिसांनी तात्काळ या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई केली. याप्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये 3 मुलं अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 5 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. यावरुन पालकांचेही मुलांकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.

एक-दीड तास सुरु होता तरुणांचा गोंधळ

सर्व तरुण वेगवेगळ्या कारमधून 14 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजता धरमपेठेत एका ठिकाणी जमा होऊन त्यांनी शहरातील रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाहनाच्या छतावर बसून त्यांनी आवाज करण्यास सुरुवात केली. एक ते दीड तास तरुणांचा हा गोंधळ सुरू होता.

एका तरुणाने रील बनवून इन्स्टाग्रामवर टाकली होती

यादरम्यान एकाने रील बनवून इंस्टाग्रामवर अपलोड केली. या रीलच्या आधारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी युवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा

रीलच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला

अंबाझरी पोलिसांनी या रीलच्या माध्यमातून आरोपी तरुणांना शोधून त्यांची वाहन जप्त केली आहेत. याप्रकरणी 13 तरुणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 3 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पाच वाहने जप्त

यात सात वाहनांचा समावेश होता. त्यापैकी 5 वाहनं जप्त करण्यात आली तर दोन वाहनांचा शोध सुरू आहे. या तरुणांनी हे कृत्य मौज मस्ती सोबतच दहशत निर्माण करण्यासाठी केलं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तरुणांच्या या हुल्लडबाजीमुळे अपघात झाला आणि यात कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होतो. सोबतच पालक देखील मुलांना महागड्या कार चालवायला देतात हे देखील आश्चर्यकारक आहे.