नागपुरात सुगंधी तंबाखूमध्ये भेसळ, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाच्या मुसक्या आवळल्या

| Updated on: Sep 12, 2021 | 7:15 PM

राज्यात सुगंधी तंबाखू तसेच गुटखाबंदी आहे. मात्र अवैध मार्गाने त्याचा यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. नागपूरमध्ये तर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुगंधी तंबाखूमध्ये निकृष्ट दर्जाची तंबाखू मिसळली जात होती.

नागपुरात सुगंधी तंबाखूमध्ये भेसळ, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाच्या मुसक्या आवळल्या
NAGPUR TOBACCO
Follow us on

नागपूर : राज्यात तंबाखू तसेच अमली पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री करण्यास बंदी असताना नागपुरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूमध्ये निकृष्ट दर्जीची तंबाखू टाकून ती विकली जात होती. हा सर्व प्रकार समजताच पोलिसांनी छापा टाकून एका आरोपींना अटक केलं. तसेच या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 6 लाख रुपये किमतीची भेसळयुक्त सुगंधी तंबाखू जप्त केली. (Adulterated tobacco worth of six lakh seized in nagpur one accused arrested)

सुगंधी तंबाखूमध्ये भेसळ

राज्यात सुगंधी तंबाखू तसेच गुटखाबंदी आहे. मात्र अवैध मार्गाने त्याचा यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. नागपूरमध्ये तर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुगंधी तंबाखूमध्ये निकृष्ट दर्जाची तंबाखू मिसळली जात होती. नंतर हीच  भेसळयुक्त तंबाखू लोकांना खाण्यासाठी विकली जात होती. या अजब प्रकारची माहिती नागपूरमधील पोलिसांना समजली.

सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

हा प्रकार समजताच पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. तसेच ज्या ठिकाणी तंबाखूमध्ये भेसळ करण्याचा प्रकार सुरु होता त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तंबाखूने भरलेले तसेच काही रिकामे डबे जप्त केले. तसेच या कारवाईत पोलिसांनी एक मशीनसुद्धा जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाचे मूल्य 6 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटकदेखील केले.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात, आरोपींवर कारवाईची मागणी

दरम्यान, राज्यात तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करण्यात बंदी आहे. त्यातही सुंगधी तंबाखूमध्ये दुसरी तंबाखू मिसळली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. आधीच आरोग्यास हानीकारक असलेल्या तंबाखूमध्ये भेसळ केली जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आल्यानंतर तंबाखूमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

इतर बातम्या 

VIDEO : सूनेची सासूला मारहाण, कॅमेऱ्यासमोर कानशिलात, घरातला कलह सोशल मीडियावर व्हायरल

भरदिवसा दुपारी प्रसिद्ध महिला डॉक्टराच्या घरात शिरले, मानेला धारदार कोयता लावत दरोडा, सांगलीत भयानक थरार

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

(Adulterated tobacco worth of six lakh seized in nagpur one accused arrested)