Akola : फोनवर बोलत असताना अचानक स्लॅब कोसळला, 22 वर्षाय तरुण जागीच ठार

ही हृदयद्रावक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 22 वर्षीय तरुणाचा जीव गेला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय.

Akola : फोनवर बोलत असताना अचानक स्लॅब कोसळला, 22 वर्षाय तरुण जागीच ठार
तरुणाचा मृत्यू...
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 12:01 PM

अकोला : मृत्यू कुठेही आणि कसाही गाठू शकतो, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. मोबाईल फोनवर बोलत असताना अचानक  स्लॅब कोसळला (Slab collapse) आणि तरुणाचा मलब्याखाली दबून दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना अकोला (Akola News) जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 22 वर्षीय तरुणाचा जीव गेला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. वसंत कोकरे (Vasant Kokare) असं मृत तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा मलब्याखाली दबलेला मृतदेह काढण्यात आला असून या तरुणाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. कालपर्यंत आपल्या वावरणारा वसंत आज आपल्यात नाही, यावर विश्वास ठेवणं कोकरे कुटुंबीयांना आणि वसंत याच्या मित्रांना जड जातंय. 22 वर्षीय मृत तरुणाचं नाव वसंत कोकरे असं आहे.

Video : विनायक मेटे यांच्या अपघातग्रस्त कारची EXCLUSIVE दृश्य

दुर्दैवी घटना

वसंत आपल्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यामधील जमकेश्वर इथं होतं. यावेळी प्रवासी निवाऱ्याचा स्लॅब पडला आणि नेमका त्याक्षणी वसंत त्याच ठिकाणी फोनवर बोलत होता. हा स्लॅब थेट डोक्यात पडल्यामुळे वसंत याला जबर मार डोक्यामध्ये बसला. शिवाय तो स्लॅबच्या मलब्याखाली दबला गेला आणि त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीयांना धक्का

कोकण कुटुंबीयांना वसंतच्या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. वसंत मलब्याखाली दबला गेल्याची माहिती अखेर आपत्कालीन यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर पिंजर येथील संत गाडगे बाा आपत्कालीन पथकाने वसंत कोकरे या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचावकार्य केलं. अथक प्रयत्नांनंतर अखेर वसंत कोकरे या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील लोकांनाही मोठा धक्का बसलाय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.