Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : रस्त्यावर पडली होती विजेची हायटेन्शन वायर, धावता ट्रक संपर्कात आला आणि घडला अनर्थ

नेहमीप्रमाणे शेतात लाकडं शोधण्यासाठी तो निघाला, पण तो प्रवास अखेरचा ठरला

Akola : रस्त्यावर पडली होती विजेची हायटेन्शन वायर, धावता ट्रक संपर्कात आला आणि घडला अनर्थ
दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 11:00 AM

अकोला : मृत्यू कुणाला कुठे कधी आणि कसा गाठेल, याचा काहीही नेम नाही. हेच अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना अकोला (Akola News) जिल्ह्यातील पातूर शहरात घडली. वीज तारांबाबतचा बेजबाबदारपणा एका 42 वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतला. तर अन्य एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली. ट्रक (Akola Truck) घेऊन शेतात लाकडं शोधण्यासाठी मजूर जात होते. वाटेत या ट्रकचा संपर्क वीज वाहक तारांशी झाला आणि ट्रकमध्ये तो प्रवाह उतरुन ट्रकमधील एका मजुराला विजेचा शॉक (Electric Shock) लागला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ट्रकमधील अन्य एक मजूर गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर ते अकोला रोडवर रस्त्यावर ट्रकने जात होते. शेतात लाकडं शोधण्यासाठी आणि माल भरुन आणण्यासाठी ट्रकमध्ये 42 वर्षीय शेख मुख्तार शेख महबूब आणि 50 वर्षीय शेख सलीम शेख मुसा असे दोघे जण होते. या दोघांनाही विजेचा जबर शॉक लागला.

यात 42 वर्षीय मुख्तार या मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर 50 वर्शीय सलमी शेख गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

सोमवारी दुपारी 4 वाजता पातूर शहरात 33 केव्ही सबस्टेशन जवळ कॅनॉल रस्त्यावरुन लाकडांचा माल करण्यासाठी मजूरांना घेऊन जाण्यात येत होतं. त्यावेळी ट्रक क्रमांक एमएच 27 एक्स 5921 वीज वाहक तारांच्या संपर्कात आला. रस्त्याच्या खाली आडव्या लटकत असलेल्या हाय टेन्शन विद्युत तारांना ट्रकचा स्पर्श झाला आणि अनर्थ घडला.

विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं विजेचा प्रवाह ट्रकमध्ये आला आणि ट्रकला पकडून उभ्या असलेल्या दोघ मजुरांना जबर झटका बसला. यातील मुख्तार शेख याला बसलेला विजेचा शॉक इतका भीषण होता, की त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या एका मजुरांच्या मृत्यूमुळे सगळेच धास्तावले. सध्या जखमी मजुरावर उपचार सुरु आहेत.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.