पोलिसाला धावत्या गाडीवर लटकवलं! सिनेस्टाईल झटापटीत कोण सरस? अमरावतीमध्ये थरार
वाळू माफियांनी दोन हात करताना घडली थरारक झटापट! वाळू माफियांची दादागिरी मोडून काढताना नेमकं काय घडलं?
अमरावती : अमरावती जिल्ह्याती रेती माफिया आणि पोलिसांमध्ये थरारक झटापट झाली. या झटापटीदरम्यान चक्क एका पोलीस अधिकाऱ्याला रेती माफियांनी गाडीवर लटकवून फरफटत नेलं. दीड किलोमीटर पर्यंत रेती माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला धावत्या गाडीवर लटकवलं. पण अखेर पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे रेती माफियांना अटक करण्यात आलीय. यावेळी पोलिसांसोबत रेती माफियांची धक्काबुक्की देखील झाली. या थरारक झटापटीनंतर पोलिसांना दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई केली जातेय.
अमरावती जिल्ह्यात अवैध रेती माफियांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नांदगाव पेठ येथून अमरावती शहरात येणाऱ्या एका रेती ट्रकवर कारवाईसाठी पोलीस अधिकारी योगेश इंगळे यांचा विचित्र प्रसंगाला तोंड द्यावं लागलं.
थरारक झटापट
सहाय्यक पोलीस अधिकारी योगेश इंगळे यांनी ट्रक चालकाला ट्रक थांबवण्याची विनंती केली. मात्र ट्रक चालकाने ट्रक पुढं नेला. मात्र ट्रक न थांबवता चालकाने ट्रक पुढे नेला.
यावेळी ट्रक पकडण्यासाठी चक्क पोलीस अधिकारी योगेश इंगळे हे ट्रकच्या कॅबिनला लटकले. मात्र तरीही चालकाने कशाचीही तमा न बाळगता ट्रक पुढे रेमटवला. यावेळी ट्रक चालकाने पोलीस अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. या दरम्यान, पोलिसांशी धक्काबुक्की झाली.
दोघांना अटक, ट्रकही जप्त
पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या थरारक घटनेत पोलिसांनी दोघा आरोपींनी अटक केली आहे. तर पोलिसांनी रहाटगावजवळ हा ट्रकही ताब्यात घेतलाय. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जात असून पोलिसांसमोर रेती माफियांची दादागिरी सुरुच असल्याचं या घटनेनं अधोरेखित केलंय.