Amravati : लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीला संपवलं! अमरावतीमधील शॉकिंग हत्याकांड, विहिरीत ढकलून खून

Amravati Murder News : 6 जुलैला लग्न, 5 जुलैला मुलगी बेपत्ता आणि 12 जुलैला अचानक तिची डेडबॉडी आढळून आली होती.

Amravati : लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीला संपवलं! अमरावतीमधील शॉकिंग हत्याकांड, विहिरीत ढकलून खून
तरुणीची हत्या...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 9:47 AM

अमरावती : अमरावती (Amravati Crime News) जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड घडलं. एका 19 वर्षांच्या मुलीचा लग्नाच्या आदल्या दिवशी खून करण्यात आला. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. हत्येपासूनच्या (Amravati Murder) पंधरा दिवसांच्या आत पोलिसांनी तरुणीच्या हत्येप्रकरणी तिच्या प्रियकर असलेल्या तरुणाला अटक केली आहे. या मुलीच्या वडिलांनी पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. 6 जुलैला 19 वर्षांच्या साक्षी नेवारे हीचं लग्न होणार होतं. पण पाच जुलैला ती अचानक बेपत्ता झाली. नंतर तिचा मृतदेह (Dead Body) विहिरीत विचित्र अवस्थेत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, माझ्या मुलीची हत्या झाली आहे, असा आरोप साक्षीच्या वडिलांनी केला होता. अखेर त्यांचा संशय खरा ठरलाय. साक्षीचा तिच्यात प्रियकराने लग्नाच्या आदल्या दिवशी विहिरीत ढकलून खून केल्याचं निष्पन्न झालंय.

6 जुलैला लग्न, 5 जुलैला बेपत्ता

6 जुलैला लग्न, 5 जुलैला मुलगी बेपत्ता आणि 12 जुलैला अचानक तिची डेडबॉडी आढळून आल्यानंतर साक्षीच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला होता. नेमकं झालंय का? ही हत्या आहे की आत्महत्या, यावरुन अनेक शंका घेतल्या जात होता. साक्षी नेवरे या 19 वर्षांच्या तरुणीचा विवाह 6 जुलैला होणार होता. पण लग्नाच्या आदल्या दिवशी साक्षी गायब झाली.

सात दिवसांनंतर तिचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. तिच्या अंगावर अर्धवट कपडे आणि जीभ बाहेर आलेली असल्याचं आढळून आलं होतं. यावरुन तिचा खून झालेला असणार, अशी शंका साक्षीचे वडील संजय नेवारे यांनी घेतली होती.

हे सुद्धा वाचा

हत्येचा संशय

पाच जुलैला पहाटे चार-पाच वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. तिने आपल्यासोबत मोबाईल फोन नेलेला नव्हता. बराच वेळा जेव्हा साक्षी घरी परतली नाही, तेव्हा शोधाशोध सुरु झाली. मुलगी बेपत्ता झाल्यानं कुटुंबीयांनाही काळजी वाटू लागली. लग्नाच्या आदल्या दिवशी मुलगी गायब झाल्याने नेवारे कुटुंबीयांना चिंता सतावू लागली होती. अखेर नेवारे यांनी शिरजगाव पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली. साक्षीचा कथित प्रियकर असलेल्या महेश खाजोने याच्यासह अक्षय सोनेने यांच्यावर पोलिसांना संशय आला होता.

शोधाशोध केल्यावर अखेर गोवारीपुराच्या मागील बाजूस असलेल्या नारायण पोटे यांच्या शेतामधील विहिरीत साक्षीचा मृतदेह आढलून आला होता. गायब झाल्यापासून सात दिवसांनंतर तिच्या मृतदेहाचा पत्ता लागला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली असल्याचं उघडकीस आणलंय. पोलिसांनी साक्षीच्या कथित प्रियकराची चौकशी केली. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा झाला.

महेश खाजोने याने साक्षीला घराबाहेर बोलावून घेतलं होतं. त्यानंतर त्यांच्या कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. यानंतर रागाच्या भरात त्याने साक्षीला विहिरीत ढकलून दिलं. यात त्याने अक्षय सोनोने याचीही मदत घेतली होती. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई आता केली जातेय.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.